एक्स्प्लोर
होळीला सुनेला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सासूला कारावास
अमरावती : सुनेला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासूला तीन वर्षांचा कारावास ठोठावण्यात आला आहे. अमरावतीतील विठाबाई भुयारला जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली.
अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दंशासार येथे राहणाऱ्या विठाबाई भुयार सून प्रणाली भुयार हिचा छळ करत होत्या. दिसायला सुंदर नसल्याच्या कारणावरुन विठाबाई सुनेला त्रास देत होती. 7 मार्च 2012 ला होळीच्या दिवशी विठाबाईने प्रणालीच्या अंगावर रॉकेल टाकून आत्महत्या करण्यास सांगितलं.
सासूच्या जाचाला कंटाळलेल्या प्रणालीने स्वतःला पेटवून घेतल्याचं म्हटलं जातं. या प्रकरणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयाने सून प्रणालीला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी सासू विठाबाई भुयारला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. यामध्ये पती आणि दीराला निर्दोष सोडण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement