देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


आज लोकसभा निवडणुका झाल्या तर एनडीएला 318 जागांसह स्पष्ट बहुमत, इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलचा अंदाज


India TV-CNX Opinion Poll : आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीला काही महिनेच उरले आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने तयारीला लागले आहेत. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी रणनीती आखली जात आहे. मात्र यावेळची लढत रंजक असणार आहे. कारण 2024 ची लोकसभा निवडणुकीत दोन मोठ्या आघाड्यांमध्ये थेट लढत होणार आहे. यातील भाजपप्रणित NDA आणि विरोधकांची INDIA यांच्यात सामना पाहायला मिळेल. दरम्यान आता निवडणूक झाली तर एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळतील, याबाबत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने (India TV-CNX Opinion Poll) एक सर्वे केला. आज देशभरात लोकसभा निवडणुका झाल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील एनडीएला 318 जागांसह स्पष्ट बहुमत मिळू शकते. इंडिया टीव्ही-सीएनएक्स ओपिनियन पोलच्या अंदाजानुसार लोकसभेच्या एकूण 543 जागांपैकी एनडीएला 318, इंडियाला 175 आणि इतरांना 50 जागा मिळू शकतात. 'इतर' मध्ये अनेक प्रादेशिक पक्ष आणि अपक्षांचा समावेश आहे. वाचा सविस्तर


महाराष्ट्रात भाजपला 20 जागा मिळण्याचा अंदाज, तर INDIA ला राज्यात 45 टक्के मतं; इंडिया टीव्ही-सीएनएक्सचा ओपिनियन पोल


2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विरोधकांनी इंडिया (INDIA) नावाची आघाडी स्थापन केली आहे. 2024 ची लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित NDA आणि विरोधकांची INDIA यांच्यात थेट लढत होणार आहे. दरम्यान आज निवडणूक झाली तर एनडीए आणि इंडियाला किती जागा मिळतील, याबाबत इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने (India TV-CNX Opinion Poll) जनमत चाचणी घेतली. या ओपिनियन पोलनुसार देशात पुन्हा मोदींचंच सरकार येईल, परंतु भाजपच्या जागा कमी होऊ शकतात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात भाजपला 20 जागा मिळू शकतील, असं सर्वेक्षणातून समोर आलं आहे. वाचा सविस्तर


राहुल गांधींचं लग्न करा, सोनिया गांधी म्हणाल्या तुम्ही मुलगी शोधा; वाचा नेमकं काय घडलं?


Rahul Gandhi Marriage : काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या लग्नासंदर्भात सातत्यानं राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असते. मध्यमंतरी राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी देखील राहुल गांधी यांना लग्न करण्याचा सल्ला दिला होता. आता पुन्हा एकदा राहुल गांधींच्या लग्नाचा मुद्दा चर्चेत आला आहे. राहुल गांधी यांचे लग्न करा, असं एका महिला शेतकऱ्याने सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना सांगितले. यावर सोनिया गांधी यांनी खूप मजेशीर उत्तर दिलं आहे. तुम्हीच राहुल गांधींसाठी मुलगी शोधा असं उत्तर सोनिया गांधी यांनी त्या महिलेला दिलं. यानंतर उपस्थित असलेल्या सर्व महिला शेतकऱ्यांमध्ये एकच हशा पिकला.  वाचा सविस्तर


भले शाब्बास! इस्रोची पुन्हा एकदा यशस्वी कामगिरी, सिंगापूरच्या 7 ग्रहांचं केलं यशस्वी प्रक्षेपण


ISRO New Space Mission : अंतराळ क्षेत्रात भारताने नवा इतिहास लिहिला आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने रविवारी (30 जुलै) एकाच वेळी 7 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. यामध्ये एक स्वदेशी आणि सिंगापूरच्या सहा उपग्रहांचा समावेश आहे. हे उपग्रह आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून PSLV-C56 रॉकेटद्वारे प्रक्षेपित करण्यात आले आहे. वाचा सविस्तर 


'सरकारचा जन्मच खोक्यातून झाला आहे', ठाण्यातील उत्तर भारतीयांच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा


Uddhav Thackarey :  'जे एकमेकांमध्ये भेद करतात त्याला हिंदुत्व नाही म्हणत', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी ठाण्यातील उत्तर भारतीयांच्या मेळाव्याला संबोधित केले आहे. गडकरी रंगायतनविषयी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, 'एक सभेत बाळासाहेबांना चिठ्ठी आली ठाण्यात नाट्यगृह नाही. त्यानंतर आम्ही ठाण्याला नाट्यगृह दिलं.' पण सध्या इथे काही वेगळीच नाटकं सुरु आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्या आमदारांवर निशाणा साधला आहे. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उत्तर भारतीयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर चांगलाच निशाणा साधला. वाचा सविस्तर


Nashik News : दोघे भाऊ झोका खेळत असताना आक्रीत घडलं, नाशिकच्या दहा वर्षीय मुलाचा मृत्यू, आईचा हंबरडा! 


Nashik News : नाशिक जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक दहा वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. घरात दोघे भाऊ झोका खेळत असताना अचानक एकाला गळफास लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. क्षणभर भावाला काहीच उमगलं नाही, जेव्हा घरातल्या लोकांना ही बाब कळली, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. वाचा सविस्तर


मेष, कर्कसह 'या' राशीच्या लोकांना आज आर्थिक लाभाची संधी मिळणार; जाणून घ्या सर्व 12 राशींचं आजचं राशीभविष्य


Horoscope Today 30 July 2023 : आज रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार आज ज्येष्ठांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहील. कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कष्टाचा असेल. तर, मिथुन राशीला कामात यश मिळेल. मेष ते मीन राशीसाठी आजचा रविवार नेमका कसा असेल? काय सांगतात तुमच्या नशिबाचे भाग्यवान तारे? जाणून घ्या राशीभविष्य. वाचा सविस्तर


Today In History : नागपुरात 204 जणांना जलसमाधी तर माळीण दुर्घटनेत 151 जणांचा मृत्यू, इतिहासात आज


What Happened on July 30th This Day in History : आजच्या दिवशी इतिहासात (Din Vishesh) काय घडलं हे जाणून घेण्याची इच्छा सर्वांनाच असते. अनेक चांगल्या वाईट घटनांनी इतिहासातील तारखा नोंदलेल्या (Today History) असतात. आज म्हणजे 30 जुलै रोजी इतिहासात अनेक महत्वाच्या घटना घडल्या होत्या. आजच्याच दिवशी 1991मध्ये वर्धा नदीच्या महापुरात 204 गावकऱ्यांना मिळाली जलसमाधी होती. पुण्याजवळील माळीण गावावर 2014 मध्ये दरड कोसळली होती, यामध्ये 151 जणांचा मृत्यू झाला होता. या नकोशा आठवणी महाराष्ट्रातील लोकांना आजही आठवतात. याशिवाय इतिहासात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. तसंच, आजच्या दिवशी असणारे दिग्गजांचे जन्मदिवस आणि निधन झालेल्या महत्वपूर्ण व्यक्तींबद्दल थोडक्यात जाणून घेणार आहोत. वाचा सविस्तर