Success story : शेतकऱ्यांना (Farmers) सातत्यानं विविध अडचणींचा सामना करावा लागतो. कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकट येतात. मात्र, यातूनसुद्धा मार्ग काढत काही शेतकरी यशस्वी शेती करत भरघोस उत्पन्न मिळवत आहेत. अशाच लातूर (Latur) जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने कोथिंबीरीच्या (coriander) शेतीतून लाखोंचा नफा मिळवला आहे. फळबागेला फाटा देत त्यांनी पालेभाज्या करण्याचा निर्णय घेतला. आज ते त्यातून चांगलं उत्पन्न मिळवत आहेत. रमाकांत वळके-पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे. पाहुयात त्यांची यशोगाथा...


लातूर जिल्ह्यातील आशिव गावचे शेतकरी रमाकांत वळके-पाटील यांनी प्रयोगशील शेती केली आहे. कोथिंबीर पिकातून त्यांनी भरघोस उत्पन्न घेतलं आहे. रमाकांत वळके -पाटील यांनी द्राक्ष, ऊस यासारख्या फळबागांचे प्रयोग केले. मात्र, खर्च वजा होता हाती निराशाच येत होती. शेती व्यवसायासह पीक पद्धतीचा अभ्यास करुन रमाकांत वळके पाटील यांनी शेतात वेगळा  प्रयोग करायचे ठरवले. उत्पन्न केवळ फळबागेतूनच पदरी पडते असे नाहीतर पालेभाज्यातूनही बळीराजा लखपती होऊ शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. रमाकांत वाळके-पाटील यांच्या फळबागेच्या क्षेत्रावर आता कोथिंबीरची शेती बहरली आहे. गेल्या पाच वर्षांपासून रमाकांत वळके-पाटील हे कोथिंबीरचे उत्पादन घेत आहेत. यातून त्यांना वर्षाकाठी लाखोंचे नफा मिळत आहे.




दोन महिन्याच्या आत 16 लाख रुपयांचे उत्पन्न


लातूर जिल्ह्यातील आशिव या गावातील शेतकरी रमाकांत वळके पाटील यांना 20 एकर शेतजमिन आहे. उत्पादन वाढीसाठी वाळके पाटील यांनी ऊस, द्राक्षे यासारख्या पिकांचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यातून योग्य तो नफा न मिळाल्यामुळं मागील चार वर्षापासून त्यांनी कोथिंबीर लागवडीकडे लक्ष वळवलं आहे. आज त्यांच्या शेतीचे आणि त्यांचे आर्थिक गणित संपूर्णपणे बदलून गेलं आहे. लाखो रुपये लावून त्यांनी द्राक्ष बाग जोपासली होती. मात्र, त्यात मोठा आर्थिक फटका त्यांना बसला. आर्थिक गणित चुकणे ही नित्याची बाब होती. पीक पद्धतीमध्ये बदल करुनही अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळं चार वर्षांपूर्वी ते कोथिंबीर शेतीकडे वळले. पहिल्याच वर्षापासून लाखो रुपयांचा फायदा त्यांना मिळायला सुरुवात झाली. यावर्षी त्यांनी 16 लाख रुपयांचे उत्पन्न कोथिंबीरीच्या पिकातून मिळालं आहे. दोन महिन्याच्या आत आणि कमी खर्चामध्ये त्यांनी 16 लाखाचे उत्पादन कमावले आहे. 


एकरी 20 हजार रुपये खर्च 


चार वर्षाचा जर हिशोब काढला तर एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न त्यांनी फक्त कोथिंबीरीतून कमवलं आहे. रमाकांत वळके पाटील यांच्याकडे असलेल्या 20 एकर क्षेत्रापैकी फक्त पाच एकर क्षेत्रावर ते कोथिंबीर लावतात. एकरी 20 हजार रुपये खर्च येतो. दीड महिन्याच्या आत ते 16 लाख रुपये पेक्षा जास्त कोथींबीरीतून कमवतात. खर्च वजा जाता निव्वळ नफा 14 लाख रुपये राहतो. द्राक्ष बागेकडून हा शेतकरी आता कोथिंबिरीच्या लागवडीकडे वळला आहे. द्राक्ष बाग जोपासताना होणारा खर्च खूप मोठा आहे. नुकसान ही त्याच पटित होत असते. प्रत्येक वर्षी त्यांना फळबागांमध्ये नुकसान सहन केलं. मात्र, त्यांना अपेक्षित असलेला फायदा कधी झालाच नाही. मात्र मागील चार वर्षापासून सातत्याने ते कोथिंबीरचे पिक योग्य वेळी नियोजन करत घेत असतात. यातून त्यांनी एक कोटीपेक्षा जास्त नफा कमवला आहे. कोथिंबीर लागवडीतून आलेल्या पैशातूनच त्यांनी लातूरला घर घेतले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Vegetable price hike : राज्यात भाज्यांचे दर कडाडले; कोथिंबीर, टोमॅटो आणि कांद्याची पेट्रोलशी स्पर्धा