देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


पंतप्रधान उद्यापासून राजस्थान आणि गुजरात दौऱ्यावर, PM किसानच्या चौदाव्या हप्त्याचं शेतकऱ्यांना होणार वितरण


PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्यापासून म्हणजे 27 आणि 28 जुलैला राजस्थान आणि गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्र सरकारच्या शेतकऱ्यांना लाभ पोहोचवणाऱ्या योजनेअंतर्गत, पंतप्रधानांच्या हस्ते 1.25 लाख पीएम किसान समृद्धी केंद्रे देशाला समर्पित केली जाणार आहेत. तसेच राजस्थानमधील सीकर इथे पंतप्रधानांच्या हस्ते पीएम किसान योजनेचा 17000 कोटी रुपयांचा 14 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे. वाचा सविस्तर


Monsoon Update : राजधानी दिल्लीपासून तेलंगणापर्यंत मुसळधार पावसाची शक्यता


Monsoon Update : देशभरात मुसळधार पावसाने कहर केला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशासाठी पुढचे 72 तास फार महत्त्वाचे असणार आहेत असा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागानुसार, आज पश्चिम किनारपट्टीवर आणि 27 जुलै दरम्यान तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. IMD ने 26 ते 27 जुलै दरम्यान पूर्व मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, 27 जुलैपर्यंत दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD नुसार, 26 ते 29 जुलै या कालावधीत भारतातील विविध भागांमध्ये हवामानाच्या अंदाजानुसार हलका आणि वेगळ्या मुसळधार पावसाची शक्यता आहे. वाचा सविस्तर


आज दर घटले की वाढले? जाणून घ्या, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किमती


Petrol Diesel Price on 26 July 2023: दररोज भारतातील पेट्रोल आणि डिझेलची किंमत देशातील तेल कंपन्या ठरवतात. भारतीय तेल कंपन्यांनी बुधवार, 26 जुलै 2023 रोजी पेट्रोल (Petrol Price) -डिझेलचे दर जाहीर केले आहेत. आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. वाचा सविस्तर


पुण्यात पकडलेल्या दोन दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी, ATS च्या तपासात समोर


Pune Crime News : पुणे पोलिसांनी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी पुणे आणि परिसरातील सुनसान जागी स्फोट करण्यासाठी बॉम्बस्फोट करण्याची प्रॅक्टिस केल्याचं एटीएसच्या तपासात समोर आलं आहे. दोन दहशतवाद्यांनी पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती एटीएसने कोर्टात दाखल केलेल्या अहवालात नमूद केली आहे. दरम्यान त्यांच्यावर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याची (यूएपीए) कलमवाढ करण्यात आली आहे. वाचा सविस्तर


Kargil Vijay Diwas: पाकिस्तानला चारी मुंड्या चित करुन भारताने 'कारगिल' जिंकलं; आज साजरा केला जातोय 'विजय दिवस'


India Pakistah Kargil War 1999 History :  सन 1947, 1965, नंतर 1971 अशा तीन-तीन युद्धात भारताने पाकिस्तानला धडा शिकवल्यानंतरही पाकिस्तानची मस्ती काही जिरली नव्हती. नंतर 1999 सालच्या कारगिल युद्धामध्ये भारताने ही कसर पूर्ण केली आणि पाकिस्तानला चारी मुंड्या चित केलं, त्याच्या नांग्या ठेचल्या. जवळपास 60 दिवस चाललेले हे युद्ध 26 जुलै 1999 रोजी संपलं. या युद्धाच्या विजयाच्या स्मरणार्थ भारतात दरवर्षी हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. वाचा सविस्तर


नोएडात जलप्रलय! शेकडो वाहने पाण्यात बुडाली, व्हिडीओ व्हायरल


Noida Flood :उत्तर प्रदेशातील गंगा आणि यमुना नदीनंतर आता हिंडन नदीच्या पाण्याचा स्तर वाढू लागला आहे. नदीचे पाणी नोएडातील रस्त्यांवर आल्याने पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नियोजित शहर समजले जाणारे नोएडा मान्सूनच्या पावसात तग धरण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. एकाच वेळी शेकडो कार पाण्यात बुडाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगावे व्हायरल होऊ लागला आहे. वाचा सविस्तर


मेष, कन्या, कुंभ राशीच्या लोकांनी 'या' गोष्टींपासून सावध राहा; जाणून घ्या सर्व 12 राशींचे राशीभविष्य


Horoscope Today 26 July 2023 : आज बुधवार हा महत्त्वाचा दिवस आहे. मेष आणि वृषभ राशीच्या लोकांच्या रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कर्क, वृश्चिक, धनु राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. त्याच वेळी, काही राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेष ते मीन राशीसाठी बुधवार कसा राहील, काय सांगतात तुमचे भाग्यवान तारे? जाणून घ्या आजचं राशीभविष्य. वाचा सविस्तर


मुंबईत ढग फुटल्यासारखा पाऊस, 26 जुलैला हजारो मुंबईकरांनी जीव गमावला, भारताने कारगिल युद्ध जिंकले; आज इतिहासात


26th July Important Events : 26 जुलै 2005 रोजी मुंबईमध्ये त्या दिवशी पडलेल्या पावसाने कहर केला आणि त्यामुळे मुंबई थांबली. मुंबईची लोकल असो वा बस, सगळ्या गाड्या जागच्या जागी थांबल्या. या दिवशी झालेल्या पावसामुळे एक हजाराहून अधिक मुंबईकरांनी आपला जीव गमावला. वाचा सविस्तर