Monsoon Update : देशभरात मुसळधार पावसाने (Monsoon) कहर केला आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने राजधानी दिल्लीसह संपूर्ण देशासाठी पुढचे 72 तास फार महत्त्वाचे असणार आहेत असा इशारा दिला आहे. भारतीय हवामान विभागानुसार, आज पश्चिम किनारपट्टीवर आणि 27 जुलै दरम्यान तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. IMD ने 26 ते 27 जुलै दरम्यान पूर्व मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तर, 27 जुलैपर्यंत दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. IMD नुसार, 26 ते 29 जुलै या कालावधीत भारतातील विविध भागांमध्ये हवामानाच्या अंदाजानुसार हलका आणि वेगळ्या मुसळधार पावसाची शक्यता आहे.
देशात कुठे मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता?
हवामान विभागानुसार, वायव्य भारतात, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातही शुक्रवारपर्यंत पाऊस पडणार आहे. 26 आणि 27 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. पूर्व राजस्थानमध्ये 26 ते 27 आणि पश्चिम राजस्थानमध्ये आज पाऊस पडेल. जम्मू-काश्मीरमध्ये 26 आणि 2 जुलै रोजी पाऊस पडेल, तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता
मध्य भारतातही मुसळधार पाऊस पडेल. मंगळवार ते शुक्रवार या कालावधीत विदर्भ आणि छत्तीसगडमध्ये पाऊस पडेल. 26 आणि 27 जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल. पूर्व मध्य प्रदेशात 26 ते २८ जुलैपर्यंत पाऊस पडेल, तर 27 जुलैला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. IMD ने पुढे असा अंदाज वर्तवला आहे की पश्चिम भारत, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील घाट क्षेत्रांमध्ये मंगळवार ते शनिवारपर्यंत मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल.
किनारपट्टी भागातही मुसळधार पावसाचा इशारा, IMD ने सांगितले की, या काळात दक्षिण भारतातही मोठ्या प्रमाणावर पाऊस पडेल. किनारपट्टी आंध्र प्रदेश, यानाम, रायलसीमा, दक्षिण अंतर्गत कर्नाटक आणि केरळ आणि माहे येथे 27 जुलैपर्यंत पाऊस पडेल, तर तेलंगणात मंगळवार ते शुक्रवार पाऊस पडेल. किनारपट्टी आणि उत्तर अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये आज पाऊस पडेल. यादरम्यान अनेक भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यात पुढे म्हटले आहे की ईशान्य भारतात, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात 29 जुलैपर्यंत आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये 28 आणि 29 जुलैपर्यंत बऱ्यापैकी पाऊस पडेल. दुसरीकडे, 27 आणि 28 जुलै रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :