देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील...


Rain Forecast : वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट


Unseasonal Rain Alert : राज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसाने (Rain News) धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील 24 तासात  विविध ठिकाणी पावसाची हजेरी (IMD Rain Alert) पाहायला मिळणार आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. या वीकेंडलाही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता कायम आहे. वाचा सविस्तर...


Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यात अवकाळी पावसाचा हाहाकार, चौघांचा मृत्यू; शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान


Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain)  झोडपून काढले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) परभणी (Parbhani) , जालना (Jalna) , नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बीड (Beed) जिल्ह्यातील अनेक भागांना वकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा फटका बसला आहे. वाचा सविस्तर...


Ayodhya Ram Mandir : रामभक्तांसाठी विलक्षण पर्वणी! भव्य राम मंदिर निर्माणानंतरची पहिलीच रामनवमी, अयोध्येत जोरदार तयारी


मुंबई : प्रभू श्रीराम तब्बल 500 वर्षांनंतर अयोध्येत (Ayodhya) भव्य-दिव्य अशा राम मंदिरात (Ram Mandir) विराजमान झाले. प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishtha) सोहळा संपन्न झाला, त्याला आता तीन महिने उलटले आणि अशातच आता रामनवमीची चाहुल लागली आहे. प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी (Ram Navami) आहे. त्यामुळे, या सोहळ्याला खास महत्त्व प्राप्त झालं आहे. रामनवमी सोहळ्यासाठी अयोध्येत जोरदार तयारी सुरू आहे. वाचा सविस्तर... 


मोठी बातमी : मासिक पाळीदरम्यान तरुणींना सुट्टी मिळणार, या राज्यातील विद्यापिठाचा मोठा निर्णय


Periods Leave Punjab University : मासिक पाळीदरम्यान तरुणींसाठी शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. या काळात शरीराला आरामाची आवश्यकता असते. मात्र मासिक पाळीच्या काळात मुलींना आराम मिळावा यासाठी एक महत्त्वाचा निर्णय पंजाब राज्यातील विद्यापिठाने घेतला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा (Menstrual Leave) देण्याचा निर्णय पंजाब विद्यापिठाने (Punjab University) घेतला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यापिठाने हा नवा नियम लागू केला आहे. वाचा सविस्तर...


Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha : एकीकडे खैरेंच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन, दुसरीकडे महायुतीचा उमेदवारचं ठरेना; संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं!


Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तिसऱ्या टप्प्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात झाली असून, अजूनही महायुतीमधील काही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. ज्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघाचा (Chhatrapati Sambhaji Nagar Lok Sabha Constituency) देखील समावेश आहे. एकीकडे महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या हस्ते केले जाणार आहे. दुसरीकडे महायुतीत संभाजीनगरची जागा नेमकी कोणत्या पक्षाकडे याचाच निर्णय झालेला नाही. त्यामुळे संभाजीनगर लोकसभेचं राजकारण तापलं असून, महायुतीमधील इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. वाचा सविस्तर...


Hardik Pandya IPL 2024: हार्दिक पांड्याचं सर्वात मोठं रहस्य...; माजी खेळाडूने सत्य लपवत असल्याचा केला दावा


Hardik Pandya IPL 2024 Marathi News: आयपीएल 2024 च्या हंगामात मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या (Hardik Pandya) अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. यापूर्वी आपल्या खराब कर्णधारामुळे ट्रोल झालेल्या हार्दिकवर आता दुखापत लपवत असल्याचा आरोप केला जात आहे. वाचा सविस्तर...


Horoscope Today 13 April 2024 : मेष, वृषभ राशीच्या नोकरीत बढतीची संधी; मिथुन राशीसाठी आजचा दिवस आव्हानात्मक; वाचा शनिवारचं राशीभविष्य


Horoscope Today 13 April 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मेष, वृषभ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) वाचा सविस्तर...