Marathwada Unseasonal Rain : मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांना मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोडपून काढले आहेत. छत्रपती संभाजीनगरसह (Chhatrapati Sambhaji Nagar) परभणी (Parbhani) , जालना (Jalna) , नांदेड (Nanded), हिंगोली (Hingoli), बीड (Beed) जिल्ह्यातील अनेक भागांना वकाळी पाऊस, गारपीट, वादळाचा फटका बसला आहे. आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून, शेकडो हेक्टरवरील ज्वारी, मका, बाजरी, फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मराठवाड्यात प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे 2 हजार 716 हेक्टर पिकांवरील नुकसान झाले आहेत. तर 777 हेक्टरवरील फळ पिकांचे झालं नुकसान झाले आहेत.
अवकाळी पावसामुळे सर्वाधिक नुकसान बीड जिल्ह्यात झाले आहे. मराठवाड्यात 84 लहान-मोठी जनावर दगावली असून, 356 घरांची पडझड झाली आहे. गारपीटमुळे मराठवाड्यातील 201 गाव बाधित झाली असून, 4 हजार 301 शेतकऱ्यांना गारपिटीचा फटका बसला आहे.
मराठवाड्यात कोणत्या जिल्ह्यात नुकसान
- छत्रपती संभाजीनगर 163 हेक्टरवरील पिकांचे नुकसान.
- जालना 134 हेक्टर पिकांचे नुकसान.
- परभणी 50 हेक्टर पिकांचे नुकसान.
- हिंगोली 297 हेक्टर पिकांचे नुकसान.
- नांदेडमध्ये 749 हेक्टर पिकांचे नुकसान.
- बीडमध्ये सर्वाधिक 1021 हेक्टर पिकांचे नुकसान
- लातूरमध्ये 50 हेक्टर पेक्षा अधिक पिकांचे नुकसान
- धाराशिव जिल्ह्यातही 308 हेक्टर पिकांना गारपिटीचा फटका बसला आहे.
लातूर जिल्ह्यात फळबागांचे मोठं नुकसान
लातूर जिल्ह्यात तीन दिवस सातत्याने अवकाळीचा फटका बसत आला आहे. यामुळे जिल्हाभरात नऊ जनावर दगावली आहेत. तर, 25 एकर पेक्षा जास्त फळबागेचा आणि शेतीचं नुकसान झालं आहे. तसेच, जिल्ह्यात 9 जनावरे दगावली असून, लातूर आणि जळकोट तालुक्यातील काही ठिकाणी फळबागांचे नुकसान झालंय. या दोन तालुक्यात मिळून जवळपास 25 एकर क्षेत्रावरील फळबागांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाने दिली आहे. अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे आकडेवारी तात्काळ प्रशासनाकडे येत आहे. प्रशासन योग्य ती खबरदारी घेत असल्याची माहिती लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यात वीज पडून महिलेचा मृत्यू...
बीडच्या गेवराई तालुक्यातील मन्यारवाडी येथे वीज पडून एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून, यामध्ये पंधरा वर्षाचा मुलगा गंभीररित्या भाजला आहे. त्याच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मीना गणेश शिंदे असं या महिलेचे नाव असून, महिला आणि मुलगा दोघेजण शेतामध्ये काम करत असताना अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामध्येच मीना शिंदे यांच्या अंगावर विज पडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर, त्यांच्या बाजूला असलेला ओमकार शिंदे हा पंधरा वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
परभणी दोघांचा मृत्यू, शेतीचे प्रचंड नुकसान
परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून, सलग 3 दिवसांपासुन जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने नुकसान होत आहे. काल सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जनावरांचा देखील मृत्यू झालाय. तसेच अनेक ठिकाणी आंबा फळबागांसह भाजीपाल्याचे नुकसानही झाले आहे. वीज पडून गंगाखेड तालुक्यातील ईळेगाव येथील 55 वर्षीय बाबुराव शेळके या शेतकऱ्याचा मृत्यु झाला. तर, सोबत असणाऱ्या दोन महिला सुदैवाने बचावल्या आहेत. तसेच, सोनपेठ तालुक्यातील भाऊंचा तांडा येथील हरिबाई सुरनर यांचाही वीज पडून मृत्यू झालाय. सोबतच आणखी दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून 6 जनावरे दगावली आहेत. दुसरीकडे भाजीपाल्यांचे ही नुकसान झाले आहे. पुर्णा तालुक्यातील चुडावा, दस्तापुर आदी ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. माधव शिनगारे या शेतकऱ्यांने टमाट्यामध्ये आंतरपीक दोडका घेतलं होतं, वेलवर्गीय पिकाला नुकतीच फळधारणा सुरू झाली होती. मात्र, अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने हा फड पूर्ण उध्वस्त झाला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या :
Rain Forecast : वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट