Periods Leave Punjab University : मासिक पाळीदरम्यान तरुणींसाठी शारीरिक आणि मानसिक थकवा येतो. या काळात शरीराला आरामाची आवश्यकता असते. मात्र मासिक पाळीच्या काळात मुलींना आराम मिळावा यासाठी एक महत्त्वाचा निर्णय पंजाब राज्यातील विद्यापीठाने घेतला आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना मासिक पाळी रजा (Menstrual Leave) देण्याचा निर्णय पंजाब विद्यापीठाने (Punjab University) घेतला आहे. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी विद्यापीठाने हा नवा नियम लागू केला आहे. 


पंजाब विद्यापीठाचा मोठा निर्णय


मासिक पाळीदरम्यान (Periods Leave) तरुणींना सुट्टी देण्याचा मोठा निर्णय पंजाब विद्यापीठाने घेतला आहे. चंदीगडमधील पंजाब युनिव्हर्सिटीने विद्यार्थीनींसाठी मासिक पाळीदरम्यान सु्ट्टी जाहीर केली आहे. पंजाब राज्यात पहिल्यांदाच असा निर्णय घेण्यात आला आहे. पंजाब विद्यापीठाने याबाबतची माहिती देणारे परिपत्रक जारी केले आहेत. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने मासिक पाळीदरम्यान सु्ट्टी जाहीर करताना त्यासाठी काही अटीही घातल्या आहेत.


अनेक देशांमध्ये मासिक पाळीच्या काळात महिलांना आराम मिळावा, यासाठी त्यांना पिरियड लीव दिली जाते. मात्र, भारत सरकारकडून अद्याप या पिरियड लीव संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये विद्यार्थीनींना मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिली जाते.


मासिक पाळीदरम्यान तरुणींना सुट्टी मिळणार


चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाच्या कुलगुरूंनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं आहे की, आगामी शैक्षणिक सत्र 2024-25 पासून विद्यार्थिनींना अटी आणि शर्तींसह मासिक पाळीदरम्यान रजा दिली जाईल. पण ही रजा फक्त एक दिवसासाठी देण्यात येणार आहे. 


मासिक पाळीदरम्यान सु्ट्टीसाठी काही नियम आणि अटी



  • मासिक पाळीसाठी रजा घेण्यासाठी विद्यार्थिनींना प्रथम विभागीय कार्यालयात उपलब्ध फॉर्म भरावा लागेल. 

  • फॉर्म सबमिट करणाऱ्या विद्यार्थीनीला रजेची परवानगी मिळेल. 

  • एक विद्यार्थीनी मासिक पाळीमुळे एका महिन्यात एक दिवसाच्या रजेसाठी अर्ज करू शकते. 

  • संबंधित विद्यार्थ्यीनीची वर्गात किमान 15 दिवस उपस्थिती असल्यास तिला मासिक पाळीदरम्यान सुट्टी दिली जाईल. 

  • नियमानुसार प्रत्येक सेमिस्टरला चार दिवस सुट्टी दिली जाईल.


'या' देशांमध्ये महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टी


ब्रिटन, जपान, तैवान, इंडोनेशिया आणि झांबिया या देशामध्ये देखील महिलांना पीरियड लीव म्हणजेच मासिक पाळीदरम्यान रजा घेण्याची परवानगी आहे. स्पेनच्या (Spain) संसदेने 2023 मध्ये महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आणि महिलांना मासिक पाळीदरम्यान सुट्टीची (Menstruation Leave) घोषणा केली होती. भारतातही महिलांना मासिक पाळीच्या काळात (Paid Periods Leave) भरपगारी रजा मिळावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारण्यास नकार दिला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Menstrual Leave : महिलांना मासिक पाळीच्या काळात सुट्टीची मागणी, सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली