मुंबई : देशभरात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत. कोरोनाबाधितांमध्ये पोलिसांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त पोलिसांची संख्येने एक हजाराचा टप्पा पार केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मागील 24 तासात तब्बल 221 पोलीस कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण 1007 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी सात जणांचा मृत्यू झाला असून 113 जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोनाविरुद्ध आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यांच्याप्रमाणे पोलीस फ्रण्ट लाईनवर लढत आहेत. परंतु या कोरोना योद्ध्यांमध्येच संसर्ग वाढला आहे. त्यात पोलिसांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये 901 कर्मचारी आणि 106 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर मुंबई पोलीस दलातील चार आणि पुणे, नाशिक, सोलापूर पोलीस दलातील प्रत्येकी एका पोलिसाने प्राण गमावले आहेत.
दरम्यान, संपूर्ण राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 22 हजारांपेक्षा जास्त आहे. एकट्या मुंबईत 13 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आहेत.
Coronavirus | कोरोना योद्धेच व्हायरसच्या विळख्यात, महाराष्ट्रातील 531 पोलीस कोरोनाबाधित
मुंबईत पोलिसांवर तरुणाचा कोयत्याने हल्ला, दोघे जखमी; मरिन ड्राईव्हवरील थरारक घटना
सात पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू
मुंबई पोलीस दल - वाकोला पोलीस स्टेशनमधील हेड कॉन्स्टेबल चंद्रकांत पेंदूरकर
मुंबई पोलीस दल - हेड कॉन्स्टेबल संदीप सुर्वे
मुंबई पोलीस दल - कुर्ला वाहतूक विभाग, पोलीस नाईक शिवाजी नारायण सोनावणे
पुणे पोलीस दल - फरासखाना पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिलीप पोपट लोंढे
सोलापूर पोलीस दल - एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक ताजुद्दीन रहिमान शेख
मुंबई पोलीस दल - विनोबा भावे नगर पोलीस स्टेशन, सुनील दत्तात्रय करगुटकर
नाशिक पोलीस दल - पोलीस मुख्यालय, हेड कॉन्स्टेबल साहेबराव झिपरु खरे