Monsoon News : पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा
पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. याबाबतचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे.
![Monsoon News : पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा Monsoon News Heavy rains expected in Maharashtra for next 5 days Monsoon News : पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/07/04/39d349c54485a9f45b0413b0d9a15972_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Monsoon News : पुढील 5 दिवस महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता आहे. याबाबतचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिला आहे. तर विदर्भात आज आणि उद्या मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता तर मध्य महाराष्ट्रात 6 आणि 7 जुलैला मुसळधार अंदाज हवामान विभागानं वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा असल्यानं तसेच बंगालच्या उपसागरात देखील कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यानं महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मुंबईत आज संध्याकाळनंतर पावसाचा जोर बघायला मिळणार आहे. पुढील पाच दिवस मुंबई आणि ठाण्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळं काही ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
सध्या राज्याच्या काही भागात पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी अद्यापही पाऊस पडताना दिसत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. शेतकरी संध्या पावसाची वाट बघत आहे. सध्या मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात चांगला पाऊस पडताना दिसत आहे. तसेच कोकणात देखील चांगला पाऊस पडत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याचबरोबर पालघर जिल्ह्यातही पावसानं चांगली हजेरी लावली आहे. त्यामुळं तेथील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जूनमध्ये उघडीप दिलेल्या पावसाचा जुलैमध्ये काही भागात जोर वाढल्याचे चित्र दिसत आहे.
दरम्यान, नेहमीप्रमाणे यंदाही भारतीय हवामान विभागाने वर्तविलेल्या पावसाचा अंदाजापेक्षा एकदम उटल परिस्थिती निर्माण झाली. जून महिन्यात विदर्भातील अकराही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून लवकर दमदार पाऊस न झाल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येणार असल्याची स्थिती आहे. पावसाळा सुरु होऊन एक महिना उलटला आहे. तरी औरंगाबाद जिल्ह्यात 'कही खुशी कही गम' अशी परिस्थिती आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणी सुद्धा केली आहे. पण अपेक्षाप्रमाणे पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी दुबारपेरणीच संकट बळीराजावर ओढवला आहे.
महत्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)