पुणे: मनसेचे नेते वसंत मोरे यांना अखेर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भेटीसाठी वेळ दिली आहे. उद्या, सोमवारी सकाळी 11 वाजता वसंत मोरे हे राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. राज ठाकरे यांच्या मुबंईतील शिवतीर्थ या निवासस्थानी ही भेट होणार आहे. राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदीवरील भोंग्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून वसंत मोरे नाराज आहेत.


पुण्यातील मनसेचा कुठलाही पदाधिकारी भेटीवेळी सोबत असणार नाही. वसंत मोरे एकटेच मुबंईमध्ये राज ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं समजतंय. लोकप्रतिनिधी म्हणून अजूनही आपल्या भूमिकेवर वसंत मोरे ठाम आहेत. वसंत मोरे यांनी घेतलेल्या निर्णयामुळें मनसेच वसंत मोरे यांच्याकडं असलेलं पुणे शहराध्यक्ष पद काढून साईनाथ बाबर यांना मनसेने शहराध्यक्ष पद दिलं आहे.


या सर्व घडामोडी नंतर वसंत मोरे यांना सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे फोन आले होते. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्याला संपर्क केला नसल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं आहे. शिवसेनेच्या काही नेत्यांनी फोन केला. तर राष्ट्रवादी काँग्रेस मधून स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील संपर्क साधल्याच मोरे सांगत आहे. मात्र आपण मनसेतच राहणार आपण मनसैनिक आहोत असं मोरे यांनी स्पष्ट केलंय.


आता या सगळ्या घडामोडीनंतर वसंत मोरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर काय निर्णय घेतात, या दोघांमध्ये काय चर्चा होते हे पाहव लागणार आहे.


यानंतर वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितली होती. परंतु राज ठाकरे यांनी सुरुवातीला त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नव्हता. महत्त्वाचं म्हणजे पुण्यातील नाराजीनाट्यानंतर राज ठाकरेंनी शहरातील प्रमुख नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. परंतु यात वसंत मोरेंना निमंत्रण नव्हतं. आता मात्र वसंत मोरेंना भेटीसाठी वेळ मिळाली आहे. 


राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंग्यांबाबत वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यामुळे आपली अडचण झाल्याचं जाहीरपणे सांगणाऱ्या वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या जागी साईनाथ बाबर यांची मनसे पुणे शहराध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. 


महत्त्वाच्या बातम्या: