Devendra Fadnavis : विधानसभा पोट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस(devendra fadnavis) हे सध्या कोल्हापूर(Kolhapur) दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना देवेंद्र फडवीस यांनी विरोधकांवर अनेक गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्तीत बाजी मारणाऱ्या पृथ्वीराज पाटील याला भाजपकडून पाच लाखांचे बक्षिस दिले जाणार असल्याचं देखील त्यानं जाहीर केलं.
महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत यश यश मिळवणाऱ्या पृथ्वीराज पाटील याला भाजप पक्षाकडून पाच लाखाचं बक्षीस देण्यात येणार असल्याचं देखील देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. तसेच उत्तर कोल्हापूरातील मतदार संघाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले, 'उत्तर कोल्हापूर हा आमच्या विचारला मानणारा मतदार संघ आहे. आता काँग्रेस ही जागा लढतेय. इथल्या मतदारांची केमिस्ट्री पूर्णपणे बदलली आहे. मतदारांची केमिस्ट्री ही भगव्याच्या बाजूनं आहे हे पाहायला मिळत आहे.'
देवेंद्र फडणवीस यांचे नाना पटोले यांच्यावर टीकास्त्र
'नाना पटोले यांना न विचार करण्याची जुनी सवय. भगव्याचा त्यांना तिटकारा आहे. पण भगवा घेऊन पुढे जाणार', असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली आहे.
कोल्हापुरातील मंत्र्यांवर फडणवीसांचे गंभीर आरोप
फडणवीस म्हणाले, कोल्हापुरात मंत्री मोठ्या प्रमाणात दहशत माजवत आहेत. ही दहशत मतदार मोडून काढतील आणि भाजपला मतं देतील. महाविकास आघाडीबद्दल नागरिकांत संताप आहे. महापुरात हे सरकार काही देऊ शकले नाही. कोल्हापूरच्या विकासात महाविकास आघाडीचे काय योगदान आहे? येथील मंत्र्यांमुळे कोल्हापूरकरांचा पूर्ण भ्रमनिरास झाला आहे.'
'पंढरपुरात विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आता अंबाबाईचा मिळेल'
भाजपचे 107 क्रमांकाचे आमदार म्हणून सत्यजित कदम निवडून येतील. पंढरपुरात विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला आता अंबाबाईचा आशीर्वाद आम्हाला मिळेल. शिवसेनेने सर्वच मतदार आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत करतील. नाना कदम भाजपचे 107 वे आमदार म्हणून निवडून येतील.'
'एसटी आंदोलनात सरकारने खूप आडमुठेपणा घेतला आहे. सरकारनं हा संप पाच महिने चिघळत ठेवला, असं एसटी संपाबाबत फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :