एक्स्प्लोर
आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड

अमरावती : अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आली. तोडफोड सुरु असताना पोलिस तिथे हजर असून कोणीही त्यांना जुमानलं नाही. पोलिसांसमोरच कार्यालयाच्या काचा फोडल्या आणि खुर्च्याही फेकल्या दरम्यान, भाजपच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केल्याचा आरोप, आमदार रवी राणा यांनी केला आहे. अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटेंविरोधात केलेल्या विधानामुळे रवी राणांच्या ऑफिसची तोडफोड झाल्याचं म्हटलं जात आहे.
...तर प्रवीण पोटेंच्या कानाखाली लगावेन : रवी राणा
काय आहे वाद? अमरावतीच्या भीमटेकडी परिसरात डॉ. आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण नियोजित होतं. मात्र परवानगी मिळण्याआधीच 13 तारखेच्या मध्यरात्री आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पुतळ्याचं अनावरण केलं. यानंतर घेतलेल्या जाहीर सभेत रवी राणा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अडथळा आणणारे प्रवीण पोटे यांच्या कानाखाली लगावेन, अशी धमकी दिली होती. रवी राणा हे अमरावतीतील अपक्ष आमदार आहेत. तर प्रवीण पोटे हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रीही आहेत.Before You Go
Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















