एक्स्प्लोर

Nitesh Rane: नितेश राणे यांच्या जामिनावरील सुनावणी पूर्ण, उद्या 11 वाजता निर्णय

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अडचणीत अडकलेले आमदार नितेश राणे यांच्या जामिन अर्जावर आजची सुनावणी पार पडली आहे.

Nitesh Rane : भाजप आमदार नितेश राणे हे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेनेच्या संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मागील काही दिवसांपासून अडचणीत आहेत. नितेश राणे यांना सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांच्या नियमित जामिनासाठी सिंधुदुर्ग न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेत उद्या 11 वाजता निर्णय सुनावणार असल्याचं जाहीर केलं. 

जिल्हा सत्र न्यायाधीश रोटे यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार आमदार नितेश राणे हे शरण आल्यानंतर कस्टडी मध्ये घेतलं नाही, अशी तक्रार करत सरकारी वकील प्रदीप घरत यांनी आमदार नितेश राणे यांची सुनावणी सिंधुदुर्ग सत्र न्यायाधीश रोटे यांच्या समोर न करण्याचा अर्ज न्यायालयात दिला होता. तर राणेंचे वकील सतीश माने शिंदे यांनी व्यायालयात नियमित जामिनासाठी अर्ज केला तेव्हापासून सरकारी वकील विविध गोष्टीतून वेळकाढूपणा करत असल्याचं सांगत, दुसऱ्या व्यायालयासमोर सुनावणी घेण्यासाठी केलेला अर्ज बरखास्त करा अशी मागणी केली होती. दरम्यान दोन्ही बाजूंचे म्हणने ऐकून घेत हा अर्ज न्यायालयाने रद्द केला. तर दुसरीकडे जामिन अर्जावरील दोन्ही बाजूंचा युक्तीवाद संपल्यानंतर निर्णय उद्या 11 वाजता सुनावण्यात येणार असल्याचं न्यायालयाने सांगितलं.

काय घडलं न्यायालयात?

सर्वात आधी नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे आणि संग्राम देसाई यांनी आपली बाजू मांडली. यावेळी शिंदे यांच्याकडून सरकारी वकील प्रदीप घरत हे जामिन मिळू नये यासाठी वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप वारंवार करण्यात आला. यावेळी सरकारी वकीलांनी व्हॅनिटी व्हॅनमध्ये मारहाणीचा कट रचला असा दावा करत व्हॅनिटी व्हॅन तपासण्याची मागणी केली. तर यावेळी कोकण रेल्वेमधूनही प्रवास केला असल्याने कोकण रेल्वे गाडी तपासणी घेतली जाऊ शकते का? असा सवाल शिंदे यांनी केला. तसंच परब यांच्यावरील हल्ल्यानंतर तपासापूर्वीच राणे यांचं नाव मीडियासमोर जाहीर केलं अशी तक्रारही शिंदे यांनी केली. 20 मिनिटे युक्तिवाद केल्यानंतर यावेळी कोतवाल व्यायालयाचा व्यायनिवाडा ही त्यांनी व्यायालयात सादर करत सरकारी पक्षाने बराच वेळकाढूपणा केला असून आतातरी जामिन मिळावा अशी विनंती केली आहे.

शिंदेनंतर वकील संग्राम देसाई यांनीही युक्तिवाद केला. ते म्हणाले, 'राकेश परब यांनी आपल्या ताब्यातील मोबाईल पोलिसांना दिले आहेत,  तसंच व्हॅनिटी व्हॅनच्या चालकाने कणकवली पोलिसांना सर्व कागदपत्रे सुपूर्द केली आहेत. तसंच सुपारी देऊन हल्ला करायला लावला असं  विधान केलं जात असताना पैसे दिले-घेतले असा पोलिसांच्या तपासात कुठेही उल्लेख झालेला नाही. तसंच 11 केसेस नीतेश राणेंवर तर दोन केसेस राकेश परबवर असल्याच आरोप केला जात असून यातील अनेक केसेस खोट्या आहेत. तसंच राणे हे जामिन मिळाल्यास  बाहेर येऊन इतरांना धमकावतील असा आरोप सरकारी पक्षाकडून केला गेल्यानंतर नीतेश राणेंची अशी कोणतीही पार्श्वभूमी नसून त्यांना जामिन मिळावा, अशी विनंती संग्राम देसाई यांनी केली.

सरकारी वकीलांचा युक्तीवाद काय?

शिंदे आणि देसाई यांच्यानंतर सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद मांडत जामिन नाकरण्याची मागणी केली. सर्वात आधी त्यांनी राणेंच्या वकीलांनी परब यांना गंभीर जखम झालं नसल्याचं सांगितलं. त्यावर बोलताना परब यांच्या छातीवर गंभीर जखम करुन मारण्याचा प्रयत्न मारेकऱ्यांनी केला, असल्याचं ते म्हणाले. तसंच मारेकऱ्यांनी राणेंशी संपर्क केला होता त्यामुळे हा पूर्वनियोजित कट नाही का? असा सवालही घरत यांनी विचारला. तसंच सर्व मारहाण सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाल्याचंही घरत म्हणाले. तसंच मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुते जो पुण्याचा आहे, त्याच्या संपर्कात नितेश राणे आहेत. परब यांचा फोटो सातपुतेने राणेंना पाठवल्याने हा सर्वात मोठा पुरावा असल्याने मग हा सुपारी देऊन केलेला गुन्हा नाही का? असा सवाल घरत यांनी उपस्थित केला. तसंच संबधित हल्लेखोरांचं परब यांच्याशी कोणतही वैर नसल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. तसंच समोर आलेले CDR रिपोर्ट हा देखील महत्वाचा पुरावा असून राणे आणि सचिन सातपुते या दोघांचं लोकेशन एकत्र कणकवलीमध्ये आढळलं होतं. दरम्यान इतर चारही आरोपींचा जामिन नाकारला तसा राणेंचाही नाकारावा अशी मागणी घरत यांनी केली.

काय आहे प्रकरण?  

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणूक रणधुमाळीत शिवसेना कार्यकर्ते संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्या प्रकरणी भाजप आमदार नितेश राणे वादाच्या भावर्‍यात आडकले आहेत. 18 डिसेंबर 2021 रोजी संतोष परब यांच्यावर कणकवलीत हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. सातपुते हा भाजप आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

हे ही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 ऑक्टोबर 2026 | शनिवार
Abhijeet Dipke: सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
सीजेपीच्या अभिजीत दिपकेंची सशर्त जामिनावर सुटका; शांतता राखण्यासाठी बाँडवर सही सुद्धा घेतली
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
गोपीचंद पडळकरांना डोनाल्ड ट्रम्पही घाबरतात; चंद्रकांत पाटलांकडून दोन चॉकलेट देत आमदारास मोलाचा सल्ला
Gokul Election: कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा थेट व्हिडिओ व्हायरल
कुठं नेऊन ठेवलं गोकुळ आमचं? महायुतीच्या नेत्यांनी गोकुळच्या निवडणुकीत यल्लमाच्या परडी आणि भंडाऱ्यावर हात मारून शपथ घ्यायला लावल्या! मुश्रीफ, धनंजय महाडिकांचा व्हिडिओ व्हायरल
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
लोहगड केतन अग्रवाल मृत्यूप्रकरणात अखेर उज्ज्वल निकमांची नियुक्ती; कुटुंबीयांकडून CM फडणवीसांचे आभार
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी,
धक्कादायक! प्रदीप पूर्णेकरांच्या पुतणीला फोनवर धमकी, "तुझा नेक्स्ट गेम" म्हणत पाठवला मेसेज, कुटुंबीय भीतीच्या छायेत
UP News : एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
एकाच कुटुंबातील 5 जणांचा संशयास्पद मृत्यू; 'फूड पॉइजनिंग'चा प्राथमिक अंदाज, रात्री झोपले अन्...
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
सांत्वनाला आलेल्या प्रताप सरनाईकांसमोर पूर्णेकर कुटुंबाने आक्रोश मांडला; म्हणाले, मीनाक्षी शिंदेला तात्काळ हटवा
Embed widget