एक्स्प्लोर

दोषी आढळल्यास मंत्रीपद सोडणार : सुभाष देशमुख

अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचं अहवालातून स्पष्ट झालं आहे.

सोलापूर : भाजपचा आणखी एक मंत्री अडचणीत आला आहे. सोलापुरातील वादग्रस्त बंगल्याच्या बांधकाम प्रकरणात सहकारमंत्री सुभाष देशमुख अडचणी वाढल्या आहेत. कारण त्यांचा सोलापुरातील बंगला बेकायदेशीर असल्याचा अहवाल महापालिका आयुक्तांनी दिला आहे. मात्र दोषी आढळल्यास मंत्रीपदावरुन दूर होईन. तसंच बंगला बेकायदेशीर असल्यास स्वखर्चाने जमीनदोस्त करेन, अशी प्रतिक्रिया सुभाष देशमुख यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना दिली आहे. देशमुख यांचा बंगला आरक्षित जागेत आहे. या बंगल्याखालची जमीन महापालिकेच्या अग्निशमन विभाग, व्यापारी गाळ्यांसाठी आरक्षित आहे. त्याठिकाणी देशमुख यांनी आपला टोलेजंग बंगला बांधला आहे. काय आहे प्रकरण? देशमुख यांना 2001 मध्ये बंगल्याच्या बांधकामासाठी परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर देशमुख यांनी पुढील प्रत्येक बाबीला आपण जबाबदार राहू असं प्रतिज्ञापत्र दिलं. त्या आधारावर सोलापूर महानगरपालिकेने 2004 साली सहकार मंत्री सुभाष देशमुख यांना वन बीएचके (600 स्क्वेअर फूट) बांधकाम करण्यासाठी सशर्त परवाना दिला होता. त्यानंतर सुभाष देशमुखांनी 2011 साली पुन्हा सुधारित बांधकाम परवानगीसाठी अर्ज केला. ज्यात तळमजला आणि पहिल्या मजल्यावरील आलिशान बांधकामाचा उल्लेख होता. तेव्हाही महानगरपालिकेने सशर्त परवाना दिला. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या कागदपत्रावरुन या बांधकामात कायद्याचं उल्लंघन झाल्याचं स्पष्ट होतं. दोन एकराच्या या जागेत सहकार मंत्री सुभाष देशमुखांचा प्लॉट 22 हजार 243 स्क्वेअर फुटांचा आहे. त्यावर त्यांनी 9425 स्क्वेअर फूट बांधकामाची अधिकृत परवानगी घेतली. पण प्रत्यक्षात तीन पट जास्त बांधकाम झाल्याचा अंदाज आहे. याविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश चव्हाण यांनी 10 ऑगस्ट 2016 रोजी  उच्च नायायालयात जनहित याचिका दाखल केली. महेश चव्हाण यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने 22 नोव्हेंबर 2016 पर्यंत निर्णय घेण्याचे आदेश दिले. पण महानगरपालिका प्रशासनाने यावर काहीच कारवाई केली नाही. सहकार मंत्र्यांच्या बेकायदा बांधकामाला अभय दिल जातंय हे लक्षात आल्यावर आणखी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली. होटगी रोडवरच्या वादग्रस्त बांधकामाबद्दल काँग्रेस नगरसेविका परवीन ईनामदार यांनी जानेवारी महिन्यात आंदोलन केलं. मनपाच्या प्रवेशद्वारावर धरणे आंदोलन करुन सहकार मंत्र्यांच्या मनमानी कारभाराचा निषेध केला. पण पालिका प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची कसलीच दखल घेतली नाही. आरक्षित जागेवर बंगला : मनपा आयुक्तांचा अहवाल आता अग्निशमन दलाच्या आरक्षित जागेवर हा बंगला बांधल्याचं महापालिका आयुक्तांच्या अहवालातून स्पष्ट झालं आहे. 26 पानांचा हा अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला आहे. अहवालात सुभाष देशमुख यांच्या बंगल्याच्या बांधकामावर अनेक आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. दरम्यान हा अहवाल देऊन सोलापूर महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे रजेवर गेल्याचं कळतं. देशमुखांचा बंगला जमीनदोस्त करा : धनंजय मुंडे सुभाष देशमुख यांना एक मिनिटही मंत्रिपदावर कायम राहण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्र्यांनी कारवाई करत बंगला तातडीने जमीनदोस्त करा, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. परवान्यानुसार बांधकाम : देशमुख "अहवाल पूर्ण वाचावा, हा महापालिकेचा दोष आहे. रोख पैसे भरुन परवाना घेतला आहे. आता महापालिका अधिकाऱ्यांनी परवाना कसा दिला हे तपासून बघायला हवं. परवान्यानुसार बांधकाम केलं आहे," असा दावा सुभाष देशमुख यांनी केला आहे. "यात फेरचौकशीची गरज आहे. सरकारने योग्य तो निर्णय घ्यावा. न्यायदेवता सांगेल ते ऐकावं लागेल. दोषी आढळल्यास मंत्रीपदावरुन दूर होईन," अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी 'एबीपी माझा'ला दिली आहे. संबंधित बातम्या : आज ठरणार... सहकारमंत्र्यांचा बंगला कायदेशीर की बेकायदेशीर सुभाष देशमुखांचा बंगला बेकायदेशीरच? आरक्षित जागेवर बंगला, सहकार मंत्री सुभाष देशमुखांना नोटीस

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur MLC Election 2026: काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
काँग्रेस-भाजपमध्ये 'कांटे की टक्कर', नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीसांसह दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; नागपूर मतदारसंघात कोण विजयी गुलाल उधळणार? वाचा सविस्तर
Maharashtra Vidhan Parishad Result 2026: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 Live: विधान परिषदेच्या 5 जागांचे आज निकाल; महायुती की महाविकास आघाडी, कोण मारणार बाजी?
Maharashtra Vidhan Parishad Election Results : कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
कुणाचा गुलाल अन् कोण आमदार? महायुती-महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला; विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी
Maharashtra Wildlife Board : महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा
महाराष्ट्रात दोन नवी अभयारण्ये आणि 14 संवर्धन राखीव क्षेत्रे; मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय, 'या' जिल्ह्यांना फायदा

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी, प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणी मीनाक्षी शिंदेंची चौकशी होणार, ठाणे पोलिसांचं खंडणीविरोधीपथकानं चौकशीला बोलावलं
Election : सरपंचपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात महिलेचा पराभव..., गावकऱ्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, चिडी देवींच्या कुटुंबाला थेट 25 लाखांची आर्थिक मदत
चिडी देवींचा निवडणुकीत पराभव, गावकऱ्यांकडून थेट 25 लाखांची आर्थिक मदत, लोकांच्या एका निर्णयानं कुंटुंबाला आश्चर्याचा धक्का
Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
मुंबई-पुणे 'मिसिंग लिंक'वर नवे नियम; पिकअप व्हॅन, मालवाहतूक ट्रकसह अनेक वाहनांना प्रवेशबंदी, 1 नोव्हेंबरपासून बस, कारची वेगमर्यादा निश्चित
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
कॉम्प्युटर क्लास करुन घरी निघाला होता साहिल, मृत्यूला रेल्वेचा गलथान कारभारच जबाबदार; कुटुंबीयांचा आक्रोश
Arunachal Border Tension : 'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
'आशा आहे भारत कराराचे पालन करेल'; अरुणाचल सीमेवरील तणावावर चीनच्या उलट्या बोंबा 
Vande Bharat Sleeper Train : मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गे धावणार?
मुंबई-बंगळुरु वंदे भारत स्लीपर ट्रेनबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांकडून अपडेट, ट्रेन कोणत्या मार्गावरुन धावणार?
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
खोळंब्यानंतर लोकल सुरळीत, पण तुडूंब गर्दीमुळे प्रवाशांची हाणामारी; ठाणे रेल्वे स्थानकावर चाकरमानी संतप्त
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
इंग्रजांकडून होत नव्हता, तेवढा त्रास यांच्याकडून; वृक्षतोडीवरुन जरांगे पाटील संतप्त, साय डोंगर परिसरात भेट देणार
Embed widget