Raigad Land slide : तळीये गावच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली, जितेंद्र आव्हाडांची घोषणा
राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहमतीनं हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
मुंबई : रायगडमधील तळीये गावात दरड कोसळून 42 नागरिकांचा मृत्यू झाल्या. येथील अनेक घरं दरडीखाली गाडले गेले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांच्या पुनर्वसनाची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबत घोषणा केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या सहमतीनं हा निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.
जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं की, "कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्वीकारली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला की कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती."
कोकणामध्ये दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेमुळे बाधित झाले तळीये ता. महाड हे पूर्ण गाव वसविण्याची जबाबदारी म्हाडाने स्विकारली आहे.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) July 24, 2021
मा. मुख्यमंत्री महोदयांनी जो शब्द दिला कि कोणालाही अडचण भासू देणार नाही. ती पूर्ण करायला ही सुरुवात आहे. ही सूचना मला पवार साहेबांनी केली होती. pic.twitter.com/vdtJLl33gF
तळीये गावाला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन तेथील नागरिकांना आधार दिला. तुमच्यावर कोसळलेला प्रसंग मोठा आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:ला सावरा. बाकीच्या गोष्टी सरकारवर सोडा. आम्ही तुमचं पुनर्वसन करू. सर्वांना मदत दिली जाईल, अशा शब्दांत आधार देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तळीये गावातील मृतांच्या नातेवाईकांचे अश्रू पुसले.
तळीयेतील गावकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये. सरकार त्यांना सर्व मदत करेल, संपूर्ण नुकसान भरपाई दिली जाईल. त्यांचे योग्य पुनर्वसन करू
अशा घटना पाहता डोंगर उतार आणि कडे- कपाऱ्यात राहणाऱ्या वाड्या- वस्त्या यांना स्थलांतरित करण्याचे नियोजन करण्यात येईल. पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा नद्यांचे पाणी पावसाळ्यात वाढून पूर परिस्थिती उद्भवते. यासंदर्भात काहीतरी मार्ग काढण्यासाठी पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे, त्यादृष्टीने जल आराखडा तयार केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.