एक्स्प्लोर
नोटाबंदीवरुन सोलापूर महापालिकेत राडा, मोदींच्या विरोधात घोषणाबाजी
सोलापूर : नोटाबंदीच्या मुद्द्यावरुन सोलापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत वातावरण चांगलच तापलं आहे. सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणाबाजी करत सभागृह डोक्यावर घेतलं.
भाजप नगरसेवकांनी देखील काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना उत्तर देत मोदींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. यामुळे सर्वसाधारण सभेचं कामकाज ठप्प झालं.
नगरसेवकांनी महापौर आणि आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता गोंधळ चालूच ठेवला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचं पाहताच आयुक्तांनी पोलिस बंदोबस्त मागवला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement