एक्स्प्लोर
Advertisement
गडचिरोलीत मनोरुग्णाला कोरोनाची धास्ती, स्वच्छतेतून देतोय नागरिकांना संदेश
सध्या जगभरात कोरोनाची दहशत आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत. नागरिक स्वत:हून स्वच्छतेवर जोर देऊ लागले आहेत.गडचिरोलीत एक मनोरुग्ण लोकांना स्वच्छतेचे धडे देत आहे.
गडचिरोली : सद्यस्थितीत अख्खं जग कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली आहे. या व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाकडून सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण केलं जातं आहे. तसचं वैयक्तिक स्वच्छतेवर भर देण्यास नागरिकांना परावृत्त केलं जातंय. मात्र या व्हायरसची दहशत एका मनोरुग्ण इसमातही दिसून आली आहे. सार्वजनिक ठिकाणाची स्वच्छता करून तो नागरिकांना एक प्रकारे स्वच्छतेचा संदेश देत असल्याचा प्रकार गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा येथे बघायला मिळत आहे.
मागील अनेक दिवसांपासून मुलचेरा तालुका मुख्यालयात एक मनोरुग्ण भटकत आहे. मिळेल तिथे जेवण करणे आणि मिळेल तिथे आश्रय घेणे. कधी या गावात तर कधी त्या गावात जाऊन आपली पोटाची खळगी भरण्याचे काम तो करतो. स्वतः शरीराची काळजी घेऊ शकत नाही. पण, आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात रोगराई पसरू नये यासाठी तो मुख्य बाजारपेठेतील कचरा उचलून कचराकुंडीत टाकतो. जे शहाण्यांना जमतं नाही ते हा मनोरुग्ण करतो, हे पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करतात. मात्र सामाजिक बांधिलकी जपत तो सर्वांना लाजवत आहे.
सध्या सर्वत्र कोरोनाचा हाहाकार सुरू आहे. नगरपंचायत, ग्रामपंचायत, पंचायत समिती, तहसील कार्यालय आणि इतर कार्यालयाकडून स्वच्छतेचे उपक्रम राबविले जात आहे. एवढेच नव्हे तर मास्क वापरून हात स्वच्छ धुतल्याशिवाय कार्यालयात प्रवेशबंदी आहे. त्यामुळे लोकं वैयक्तिक स्वच्छतेवर भर देत असल्याचे चित्र जगभरातच दिसून येत आहे. मात्र, परिसर स्वच्छतेची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न निर्माण झाला असतानाच एका मनोरुग्ण व्यक्तीने स्वतःच पुढाकार घेऊन परिसर स्वच्छ करण्याची जबाबदारी हाती घेतल्याने सर्वांना लाजवेल, असा संदेश दिला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement