एक्स्प्लोर

भारतात बंदी असलेलं मेलामाईन पंढरपुरात; दूध भेसळीसाठी वापर

दूध भेसळीसाठी वापरण्यात येणारे मेलामाईन पंढपुरात सापडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. बंदी असलेल्या मेलामाईन पदार्थ दूध भेसळीसाठी वापरला जातो.

पंढरपूर : भोसे गावात दूध केंद्रावर मारलेल्या छाप्यात बंदी असलेले मेलामाईन सापडल्याने अन्न व औषध प्रशासनाला धक्का बसला आहे. या पदार्थाला भारतात बंदी असताना हे पंढरपूरपर्यंत कसे पोहचले याचा तपास पोलिस करत आहे. मेलामाईन हा पदार्थ वापरुन दुधात भेसळ केली जाते. या प्रकरणी कृत्रिम दूध आणि त्यासाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य जप्त केलं आहे. पंढरपुरातील भोसे गावात दूधात भेसळ करत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर राज्यातील अन्न व औषध प्रशासनाने या ठिकाणी छारा मारुन कारवाई केली. या दूध संकलन केंद्रात डॉ. जाधव दुधात भेसळ करत होते. देशात बंदी असलेले मेलामाइन, पॅराफीन सारखे विषारी द्रव्य दुधात टाकून भेसळ केली जात होती. 638 लिटर दूध ताब्यात घेऊन नष्ट करण्यात आलं आहे. अन्नात मेलामाइन भेसळीची पहिलीच घटना आमच्यासमोर आली आहे. यामध्ये मुंबईतील एक दलाल सहभागी असल्याची माहिती असून त्याचा शोध पोलिसांमार्फत घेतला जात आहे. आरोपी डॉक्टर जाधव हा सराईत गुन्हेगार असून याच्या आधी देखील त्याच्यावरती विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. अशी होते दूध भेसळ मेलामाईन पाण्यात टाकल्यावर पाण्याचा रंग दुधासारखा होतो. या पाण्याला दुधासारखी चव येण्यासाठी दूध पावडर व इतर पदार्थ मिसळले जातात. त्यानंतर चांगल्या 15 लिटर दुधात असे रसायनापासून तयार केलेले 40 लिटर मिश्रण टाकले जायचे. 15 लिटर दुधाचे 55 लिटर भेसळीचे दूध तयार करण्यात येते. काय आहे मेलामाईन मेलामाईन हे कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजनचा फॉर्म्युला आहे. या तिन्हींचे मिश्रण तयार केल्यावर साइनामाईड या विषारी द्रव्याप्रमाणे हे काम करते. दूधात पाणी मिसळले तर प्रत्येक लिटरमागे प्रथिनाची मात्रा कमी होते आणि दूध भेसळयुक्त आहे हे उघडकीस येते. प्रथिने मोजण्यासाठी दूधात नायट्रोजन किती आहे ते तपासले जाते. यासाठी अ‍ॅनालीटीकल केमेस्ट्रीची जेडाल्स मेथड वापरली जाते. मेलामाइन दूधात सहज मिसळते. जेडाल्स मेथड फक्त नायट्रोजन मोजत असल्याने मेलामाइनमुळे नायटोजनचे प्रमाण वाढवले गेले आहे हे उघडकीस येत नाही. त्याच कारणाने भेसळ करणारे मेलामाइन वापरतात. Milk Adulteration | नामांकित दूध कंपन्यांच्या दुधात भेसळ, 237 लिटर दूध जप्त, दोघांना बेड्या | मुंबई | ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
मोठी बातमी : 4 कोटीची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटीची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
प्रकृती बरी नसतानाही सुट्टी न दिल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थीनीचं टोकाचं पाऊल; आदिवासी मंत्री उईकेंची थेट शाळेला भेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!
छत्रपती संभाजीनगरमध्ये 12 हजार किलो खाद्यतेल जप्त; 206 पैकी फक्त 10 गुण, FDA च्या कारवाईने खळबळ!

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Someshwar Sugar Election : 'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
'सोमेश्वर'मध्ये पवार विरुद्ध पवार संघर्षात सुनेत्रा पवारांची बाजी! शरद पवार गट आणि बंडखोरांची धुळधाण; 21-0 ने दणदणीत विजय
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर राजू शेट्टींच्या नेतृत्वात हजारो शेतकऱ्यांचे बेमुदत धरणे आंदोलन, महामार्गावरच बसली जेवणाची पंगत
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
Shetkari Microfinance vs Bank Loan : सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
सरकारी बँका उपलब्ध असतानाही बळीराजा मायक्रोफायनान्सच्या पाशात का अडकतो? वाचा 10 प्रमुख कारणे
Embed widget