एक्स्प्लोर
Advertisement
राज्य शासनाच्या मेगाभरतीचा मार्ग अखेर मोकळा, कोणत्या विभागात किती पदं?
शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे.
मुंबई : राज्य शासनाच्या मेगा भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. मराठा आरक्षणाच्या सुधारणा विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राजपत्र जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे शासनाच्या विविध विभागांमध्ये रिक्त असलेल्या पदांवर भरतीला लवकरच सुरुवात होणार आहे.
मराठा समाजाला शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के आरक्षणाचा कायदा 1 जुलैपासून लागू होणार आहे. आठवड्याभरात पहिल्या टप्प्य़ाच्या नोकरभरतीलाही सुरुवात होणार आहे. आतापर्यंत साधारण 20 हजार जागांसाठी जाहिराती निघाल्या आहेत. तर उर्वरित विभागांमधील रिक्त पदांसाठी लवकरच जाहिराती निघणार आहेत.
मराठा आरक्षणबाबतच्या कोर्टाच्या निर्णयानुसार 12 -13 टक्के आरक्षणासह मराठा आरक्षण सुधारणा विधेयक मुख्यमंत्र्यांनी 1 जुलै रोजी विधानसभेत मांडलं. मराठा आरक्षण सुधारणा विधेयक सभागृहात एकमताने मंजूरही करण्यात आलं होतं. राज्य सरकारने लागू केलेलं मराठा आरक्षण उच्च न्यायालयाने वैध ठरवलं असलं तरी आरक्षणाची टक्केवारी 16 टक्क्यांवरुन शैक्षणिक 12 टक्के आणि सार्वजनिक सेवेमध्ये नोकऱ्यांसाठी 13 टक्के देण्याचा निर्णय दिला होता.
अखेर आज मराठा आरक्षण सुधारणा विधेयकावर राज्यपालांनी सही केली. त्यानंतर मेगाभरतीसाठीचं राजपत्र जाहीर करण्यात आलं. शिक्षणात 12 टक्के आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 13 टक्के मराठा आरक्षणासाठीचा कायदा 1 जुलैपासून लागू झाल्याने राज्य सरकारने मेगाभरतीसाठी पावलं उचलली आहेत. येत्या आठवड्याभरात पहिल्या टप्प्याच्या नोकर भरतीला सुरुवात होणार आहे.
कुठल्या विभागात सुरु होणार भरती?
ग्रामविकास विभाग - 13,000 पदं
कृषी – 1585 पदं
वन संरक्षक – 1500 पदं
सार्वजनिक बांधकाम विभाग – 435 पदं
जलसंधारण – 250 पदं
आरोग्य – 800 पदं
वित्त (ऑडिट) – 959 पदं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
नाशिक
निवडणूक
Advertisement