मुंबई : कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे (Omicron)दोन रूग्ण सापडल्यानंतर आता इतर राज्यांच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रातही खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनेही (mumbai municipal corporation)आता ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी अ‍ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pedekar)यांनी याबाबत माहिती दिली आहे. 


महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळांकडून आलेली सर्व माहिती आपात्कालीन कक्षाला पाठवली जाणार आहे. ही माहिती मुंबईमधील 24 वॉर रूमला कळवळी जाणार आहे. वॉर रूम मधून 7 दिवस प्रवाशांसोबत संपर्क ठेवला जाईल. प्रत्येक वॉर्ड मध्ये 10 रूग्णवाहिका तयार ठेवण्यात आल्या आहेत. महापालिकेचे पथक घरी जाऊन रूग्णांची तपासणी करेल. ज्या सोसायटीमध्ये रुग्ण आढळतील त्या सोसायटीच्या लोकांची मदत घेतली जाणार असून त्यांना तसे पत्र देण्यात येणार आहे. नागरिकांनी सजग राहून आम्हाला माहिती द्यावी आणि सहकार्य करावे. आपल्या सोसायटीमध्ये कोणी प्रवाशी आला तर त्याची माहिती पोलिसांनी द्यावी, असे आवाहनही महापौर पेडणेकर यांनी केले आहे. 


लहान मुलांची काळजी कशी घेणार?
आपल्या मुलांना त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचं आहे. आता पर्यंत आपल्याकडे एकही रुग्ण सापडला नाही. तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लहान मुलांना लागण होऊ नये म्हणून विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मुले बाहेर खेळण्यासाठी जात असतील तर पालकांनीही त्यांच्यावर लक्ष देऊन सतर्क राहणे गरजेचे आहे. जंम्बो कोविड सेंटरमध्ये मुलांवर उपचार करण्यासाठी तयारी करण्यात येत आहे. 


 मुंबईत येण्यासाठी दोन्ही डोस आणि आटीपीसीआर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल आवश्यक
नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस लवकरात लवकर घ्यावा. घरोघरी जाऊन नागरिकांना लस दिली जात आहे. काही लोक अजूनही लस घेण्यासाठी घाबरत आहेत. परंतु, कोरोनाचा प्रार्दुभाव टाळण्यासाठी लस घेणे गरजेचे आहे. मुंबईमध्ये येण्यासाठी दोन्ही डोस घेतलेल्या प्रमाणपत्रासह आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल निगेटिव्ह दाखवणे बंधनकारक आहे. 


ऑक्सीजन आणि वेंटिलेटरची तयारी पूर्ण 
मुंबईमध्ये ऑक्सीजन आणि वेंटिलेटर कमी पडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. रूग्णालयांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. 


वरळीमधील घटना दुर्देवी
वरळीमध्ये घडलेली सिलिंडरच्या स्फोटाची दुर्घटना दुर्देवी आहे. यात बाळाचे वडील मृत पावले हे कळलं. ही दुःखद घटना आहे. आता जे आई आणि बाळ आहे ते वाचावं ही प्रार्थना करू. या घटनेला जे जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. असे महापौर पेडणेकर यांनी सांगितले.  


 


संबंधित बातम्या 


Omicron News: Omicron चा धसका, सर्व राज्यं अ‍ॅक्शन मोडवर, कोणत्या राज्यांमध्ये काय आहेत नवे नियम?


'ओमायक्रॉन'वर कोविड लस किती प्रभावी? कोरोनाची तिसरी लाट येणार? जाणून घ्या महत्त्वाची माहिती