Omicron News: कोरोनाच्या ओमायक्रॉन या व्हरियंटच्या दोन रूग्णांची पुष्टी देशात झाल्यानंतर आता सरकार अॅक्शन मोडवर आली आहे. देशातील राज्यांमध्ये आता नवे नियम पाळण्यात येणार आहेत. जाणून घ्या देशातील राज्यांचे नियम 

दिल्लीमधील नियम दिल्लीमध्ये 30 हजार ऑक्सिजन बेड आणि 10 हजार ICU बेड्ची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच परदेशातून आलेल्या प्रवासांची तपासणी देखील केली जात आहे.  

यूपीयूपीमध्ये एअरपोर्टवर केंद्र सरकारने जाहिर केलेल्या नियमांचे पालन होत आहे. तसेच लक्षण असणाऱ्या प्रवाशांची   RT-PCR टेस्ट केली जात आहे. हाय रिस्क देशांमधून आलेल्या प्रवाशांना क्वारंटाईन केले जात आहे. 

महाराष्ट्रमहाराष्ट्रामध्ये दक्षिण अफ्रीका, बोत्स्वाना आणि जिंबाब्वे या देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना 7 दिवस आयसोलेट करण्यात येत आहे.   गुजरातहाय रिस्क देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जात आहे.  पश्चिम बंगाल15 डिसेंबर पर्यंत प्रतिबंध लागू करण्यात येणार आहेत. रात्री 11 ते सकाळी 5 या वेळेत आत्यावश्यक सेवा सुरू आहेत. 

बिहारहॉस्पिटल्समध्ये हायअलर्ट . नालंदा मेडिकल कॉलेजमध्ये 100 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. 

ओमायक्रॉनचे संशयित रूग्णमहाराष्ट्रत 28 जाणांची तपासणी दिल्लीमध्ये 8 जाणांची तपासणी गुजरातमध्ये एकाची तपासणी  हैदराबादमध्ये एकाची तपासणी जयपुर नऊ जणांची तपासणी  श्रीनगरमध्ये एकाची तपासणी त्रिचरापल्ली एकाची तपासणी  याशिवाय केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पुन्हा एकदा राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. केंद्र सरकारने राज्यांना सांगितले हे नियम-  आंतरराष्ट्रीय प्रवाशांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगावे. हवाई प्रवाशांची  तपासणी करावीचाचण्या अधिक केल्या पाहिजेत. लसीकरण जास्त करावेकोरोना नियमांचे पालन करावे.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या :