एक्स्प्लोर

Prashant Jadhav : कोल्हापूरकरांच्या धैर्याला सलाम! शहीद जवान प्रशांत जाधवांच्या पत्नीच्या कपाळावरील कुंकू कायम, गावकऱ्यांनी विधवा प्रथेला दिली मुठमाती

लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रकाश शिवाजी जाधव (Prashant Jadhav) यांना वीरमरण आले. आज त्यांच्या मुळ गावी लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

कोल्हापूर : लडाखमधील तुर्तक सेक्टरमध्ये खासगी बसला अपघात होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे बुद्रुकमधील प्रशांत शिवाजी जाधव (Prashant Jadhav) यांना वीरमरण आले. प्रशांत जाधव यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मुळ गावी बसर्गेमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा माजी सैनिक कल्याण राज्यमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते. अत्यंत शोकाकूल वातावरणात वीर जवानाला अंतिम निरोप देण्यात आला. 

अंत्यसंस्कारासाठी जमलेल्या अलोट जनसागराने पुष्पवृष्टी करत जाधव यांच्या पार्थिवाला अखेरची मानवंदना दिली. दरम्यान, शहीद प्रशांत जाधव आणि सातारचे शहीद सुभेदार विजय सर्जेराव शिंदे राज्य सरकारकडून प्रत्येकी रु.१ कोटींची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोशल मीडियातून दिली. 

प्रशांत जाधवांच्या अंत्यसंस्कारापासून विधवा प्रथेला मुठमाती

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड गावाने विधवा प्रथेला मुठमाती देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्याचे अनुकरण अनेक गावांमध्ये करण्यात येत आहे. शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या बसर्गे गावामध्येही त्यांच्या अंत्यसंस्कारापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे प्रशांत जाधव यांच्या पत्नी पद्मा यांचं कुंकू कायम राहिलं आहे. 

शहीद जवान प्रशांत जाधव यांच्या पश्चात पत्नी पद्मा, अवघ्या ११ महिन्यांची कन्या नियती, वडिल शिवाजी आणि आई रेणुका असा परिवार आहे. प्रशांत आठ वर्षांपूर्वीच म्हणजेच २०१४ मध्ये बेळगावमध्ये मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते. त्यांचा पद्मा यांच्याशी २०२० मध्ये विवाह झाला होता. त्यांना अवघ्या ११ महिन्यांची नियती कन्या आहे. 

बसचा ताबा सुटल्याने नदीत कोसळली

अपघातग्रस्त बसमधून २६ जवान दहशतवाद्यांना चकवा देण्यासाठी खासगी बसने प्रवास करत असतानाच थोईसेपासून 25 किमी अंतरावर बसचा ताबा सुटला. त्यानंतर बस थेट नदीत कोसळली. दरम्यान, अत्यंत जखमी अवस्थेत जवानांना चंडीमंदीर येथील कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा ७ जणांना मृत घोषित करण्यात आले. गंभीर जखमी जवानांना हवाई दलाच्या मदतीने वेस्टर्न कमांड रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

एबीपी माझामध्ये कोल्हापूर ब्युरो म्हणून गेल्या साडे तीन वर्षांपासून कार्यरत. तसेच टीव्ही 9 मराठी कोल्हापूर ब्युरो म्हणूनही कामाचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 ऑगस्ट 2026 | सोमवार
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
काही परकीय शक्तींकडून भारताला थांबवायचा प्रयत्न; तिरंगा रॅलीतून फडणवीसांनी सांगितली देशभक्ती, म्हणाले, तरुणाई थांबणार नाही
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
Video: पावसासाठी चक्क मगरीच्या तोंडासमोर बसून पूजा; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल, कृष्णा नदीच्या काठावर आली होती मगर
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत

Embed widget