एक्स्प्लोर
सासरच्या त्रासाला कंटाळून उच्चशिक्षित विवाहितेची आत्महत्या
सोलापूर : माहेरहून पैसे आणण्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून सोलापुरात एका उच्चशिक्षित विवाहितेनं आत्महत्या केलीय. प्रतिभा नवले असं या महिलेचं नाव आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी प्रतिभानं आपल्या दीड वर्षांच्या बाळासाठी चिठ्ठी लिहून त्याची माफी मागितलीय. सोलापूर-औरंगाबाद महामार्गाच्या विस्तारीकरणात प्रतिभाच्या वडिलांची जमीन संपादित झाली होती. त्याचे तीस लाख रुपये त्यांना मिळाले. त्यातील दहा लाख रुपये प्रतिभानं आणावेत असा तगादा तिच्यामागे लावण्यात आला होता.
या त्रासाबद्दल तिने आपल्या मैत्रिणीला मेसेज केले होते. त्यानुसार तिच्या सासू, सासरे आणि नवऱ्याविरोधात बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement