Marathwada Water Issue : पाणी प्रश्नावरून (Water Issue) जायकवाडी (Jayakwadi Dam) उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) असा वाद पेटला असताना आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सद्य:स्थितीत  मराठा आरक्षणाचं (Maratha Reservation) आंदोलन सुरू आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेची बाब विचारात घेता वरील धरणातून जायकवाडीत (Marathwada vs North Maharashtra Water Issue) पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सूचना देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, गोदावरी मराठवाडा (Marathwada) पाटबंधारे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता  यांनी राज्याच्या जलसंपदा विभागाच्या अपर मुख्य सचिवांना याबाबत लेखी पत्र लिहले आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचे परिणाम सर्वत्र पाहायला मिळत आहे.


काय म्हटलं आहे पत्रात? 


सर्वोच्च न्यायालयात पूर्वी दाखल असलेल्या एसएलपी 21241/2017 मध्ये आयए दाखल करण्यात आली असून याची सुनावणी 21 नोव्हेंबर रोजी झालेली आहे.


 यात सर्वोच्च न्यायालयाने पाणी सोडण्याच्या निर्णयास कुठेही स्थगिती दिलेली नाही. 


तसेच, मुंबई उच्च न्यायालयात पीआयएल 30422/23 दाखल झाली असून याची सुनावणी 7 नोव्हेंबर रोजी होऊन तेथेही या आदेशास स्थगिती दिलेली नाही आणि पुढील सुनावणी 5 डिसेंबर रोजी आहे.


पाणी सोडण्याच्या आदेशाची अद्याप अंमलबजावणी झालेली नसल्याने जायकवाडीच्या धरणाच्या निम्न भागातील लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्थांची पाणी सोडण्याबाबात आग्रही मागणी होत आहे.


गोदावरी महामंडळाच्या कार्यालयावर मोर्चे, आंदोलने करण्यात येत आहेत. यामुळे या कार्यालय परिसरात पोलीस संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे.


सद्यस्थितीत मराठा आरक्षण आंदोलन सुरू असल्याने निर्माण झालेली कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेता सध्या पाणी सोडण्याची कार्यवाही पुढील आदेशापर्यंत न करण्याच्या शासनस्तरावरून सुचना आहेत. त्यामुळे पाणी सोडण्याची कार्यवाही स्थगित ठेवण्यात आलेली आहे.


मराठवाड्यातील धरणांत किती टक्के पाणीसाठा? 


राज्यातील एकशे अडोतीस मुख्य धरणांमध्ये सध्या चौऱ्याहत्तर पुर्णांक एक्कावण्ण टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी हेच प्रमाण चौऱ्याण्णव पुर्णांक एकोणतीस टक्के इतकं होतं. सर्वांत भीषण अवस्था असलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये एकूण छत्तीस पूर्णांक सव्वीस टक्के इतकाच पाणीसाठा उरलाय. इतर जिल्ह्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वांत कमी आहे. धरणांच्या विभागवार नोंदीनुसार, छत्रपती संभाजीनगरच्या मुख्य चव्वेचाळीस धरणांमध्ये केवळ एक्केचाळीस पूर्णांक पंच्याऐंशी टक्के, तर मध्यम आकाराच्या एक्क्याऐंशी धरणांमध्ये केवळ एकोणतीस पूर्णांक अठ्ठावण्ण टक्के आणि सूक्ष्म आकाराच्या सातशे पंच्याण्णव धरणांमध्ये अवघं पंचवीस पूर्णांक अडूसष्ठ टक्के पाणी असल्याची माहिती अहवालात देण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Marathwada Water Issue : मराठवाडा विरुद्ध उ. महाराष्ट्र पाणी संघर्ष; एका भागाला पाण्याची गरज, तर दुसऱ्या भागाचा विरोध!