24 November In History : इतिहासातील प्रत्येक दिवसाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवसाचेही एक महत्त्व आहे. शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा स्मृतीदिन आहे. चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ आजच्या दिवशी प्रकाशित केला.  


 


1675: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा स्मृतीदिन


गुरु तेग बहादूर हे शिखांचे नववे गुरू होते. जे पहिले गुरु नानक यांनी दाखविलेल्या मार्गावर चालले होते. त्यांनी रचलेल्या 115 श्लोकांचा गुरू ग्रंथसाहिबमध्ये समावेश आहे. त्यांनी काश्मिरी पंडित आणि इतर हिंदूंचे जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर करण्यास विरोध केला होता.


गुरु तेग बहादूर यांचा जन्म 1621 मध्ये अमृतसर येथे झाला. ते सहावे शीख गुरू गुरु हरगोविंद यांचे सर्वात धाकटे पुत्र होते. एक तत्त्वनिष्ठ आणि निर्भय योद्धा मानला जाणारा, तो एक विद्वान आध्यात्मिक विद्वान आणि एक कवी होते. ज्यांची 115 स्तोत्रे गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत, जो शीख धर्माचा मुख्य ग्रंथ आहे. 


सहावा मुघल सम्राट औरंगजेब याच्या आदेशानुसार गुरू तेग बहादूर यांना दिल्लीत फाशी देण्यात आली. गुरु तेग बहादूर यांनी बळजबरीने धर्मांतरणास विरोध केल्याने त्यांना ही शिक्षा देण्यात आली.



1859: चार्ल्स डार्विनने आपला उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा जगप्रसिद्ध ग्रंथ ’ओरिजिन ऑफ द स्पिशिज’ प्रकाशित केला.



पृथ्वीवर जीवन कसे विकसित झाले? आणि माणसं कशी आली? आजही याबाबत एकवाक्यता नाही, पण, आपले पूर्वज माकड होते, असे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत आणि कालांतराने आपला विकास होत गेला. आपण माकडापासून मानव कसे झालो? याचा शोध चार्ल्स डार्विनने लावला. डार्विनचे ​​'ओरिजिन ऑफ द स्पिशिज' हे पुस्तक 24 नोव्हेंबर 1859 रोजीच प्रकाशित झाले. या पुस्तकात 'थिअरी ऑफ इव्होल्यूशन' असा एक लेख आहे. यामध्ये आपण माकडापासून मानव कसे बनलो हे सांगितले आहे. चार्ल्स डार्विनचा असा विश्वास होता की आपल्या सर्वांचे पूर्वज समान आहेत. आपले पूर्वज माकडे होते असा त्यांचा सिद्धांत होता. काही माकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने राहू लागली. त्यामुळे त्यांच्यात गरजेनुसार हळूहळू बदल होऊ लागले. हा बदल त्यांच्या पुढच्या पिढीत दिसून आला.



1937 :  लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा जन्म


मराठी भाषेतील लेखक, कवी, नाटककार आणि समीक्षक केशव मेश्राम यांचा आज जन्मदिन. केशव मेश्राम यांचा जन्म अनुसूचित जातीतील कुटुंबात झाला. सामाजिक भेदभाव, गरीबी यातून मार्ग काढत त्यांनी विविध ठिकाणी मजूरी केली. काम करताना त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी क्लार्क म्हणून पश्चिम रेल्वेत नोकरी केली. मात्र, त्यानंतर त्यांनी मुंबईतील महाविद्यालयात मराठी विषयाचे शिक्षक म्हणून काम केले. 


मेश्राम यांच्या 'उत्खनन' या काव्यसंग्रहाने त्यांना महत्त्वाचे कवी म्हणून प्रस्थापित केले. हकीकत आणि जटायू ही त्यांची सर्वात लोकप्रिय कादंबरी अभिमान या प्रतिभावान दलित तरुणाच्या दुःखाचे चित्रण करते, ज्याला त्याच्या निम्न सामाजिक स्थितीमुळे बाजूला केले गेले होते. अभिमानाने अंधश्रद्धेविरुद्ध लढा दिला. त्यांच्या इतर साहित्यकृती दलितांच्या दुरवस्थेशी निगडित आहेत, परंतु त्यांनी नेहमीच त्यांच्या दुर्दशेसाठी प्रस्थापित वर्गावर टीकेची झोड उठवण्यात संयम बाळगला असे म्हटले जाते.


1944 : अभिनेते अमोल पालेकर यांचा जन्म 


अमोल पालेकर हे मराठी चित्रपटसृष्टीतील व हिंदी चित्रपटसृष्टीतील एक अभिनेते, दिग्दर्शक, चित्रकार आहेत. पालेकर यांनी सत्यदेव दुबे यांच्याबरोबर मराठी प्रयोगात्मक नाटकात रंगभूमीवर पदार्पण केले आणि नंतर "अनिकेत" या नावाची स्वतःची नाट्यसंस्था १९७२ मध्ये सुरू केली. त्यांनी चित्रपटातील अभिनयाची सुरुवात 1971 मधील शांतता! कोर्ट चालू आहे  या सत्यदेव दुबे दिग्दर्शित मराठी चित्रपटातून केले. 1974 मध्ये अमोल पालेकर यांनी बासू चॅटर्जी यांच्या 'रजनीगंधा' आणि 'छोटीसी बात' या कमी खर्चात केलेल्या पण गाजलेल्या चित्रपटांत काम केले. यातूनच आणखी विनोदी चित्रपटांतून त्यांना "मध्यमवर्गीय" माणसाच्या भूमिका मिळत गेल्या. नरम गरम, गोलमाल आदी चित्रपट चांगलेच गाजले. 


मराठी बरोबरच कानडी, बंगाली, मल्याळम या भाषांतील अमोल पालेकर यांच्या चित्रपटांना समीक्षकांनी वाखाणले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यानी स्त्रियांचे चित्रण अधिक संवेदनशीलपणे केले. भारतीय साहित्यातील अभिजात कथांवर त्याचे काही चित्रपट आधारलेले आहेत. अमोल पालेकर यांच्या चित्रपटांतून आधुनिक दृष्टिकोन असतो.



1961: अरुंधती रॉय यांचा जन्मदिवस 


अरुंधती रॉय यांचे पूर्ण नाव सुझाना अरुंधती रॉय आहे. या भारतीय  साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्यांच्या द गॉड ऑव्ह स्मॉल थिंग्ज कादंबरीने 1997 वर्षीचा बुकर पुरस्कार जिंकला होता. रॉय यांच्या दोन पटकथा आणि अनेक लेखसंग्रहही प्रसिद्ध आहेत. अनेक सामाजिक, पर्यावरणविषयक आणि राजकीय मुद्द्यांवर रॉय यांचे लेखन भारतात वादग्रस्त ठरले आहे.


कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात अरुंधती रॉय यांनी चित्रपट आणि दूरचित्रवाणीसाठी काम केले, इन विच एनी गिव्ह्‌ज इट दोज वन्स (1989) या स्वानुभावावर आधारित चित्रपटाची पटकथा त्यांनी लिहिली. इलेक्ट्रिक मून (1992) ची पटकथाही त्यांनी लिहिली.


शेखर कपूर यांच्या बॅंडिट क्वीन या चित्रपटावर केलेल्या टीकेने अरूंधती रॉय प्रथम प्रकाशझोतात आल्या. द गॉड ऑफ स्मॉल थिंग्ज ही कादंबरी 1992 मध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि 1996 मध्ये त्यांनी ती पूर्ण केली. या आत्मचरित्रात्मक कादंबरीला 1997 चा बुकर पुरस्कार जाहीर झाला. 


अरुंधती रॉय यांची अनेक मते वादग्रस्त ठरली आहेत. काश्मीर, नक्षलवादाच्या मुद्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर गदारोळ झाला. अरुंधती रॉय यांनी मेधा पाटकर यांच्या नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग घेतला. 



1963 : महाराष्ट्राचे माजी मुखमंत्री मारोतराव कन्नमवार यांचा स्मृतीदिन


मारोतराव कन्नमवार हे भारतीय राजकारणी होते. 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 या काळात ते महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या कार्यकाळात त्यांचे निधन झाले. ते चंद्रपूर जिल्ह्यातील साओली विधानसभा मतदारसंघातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजकारणी होते.


इतर महत्त्वाच्या घटना 


1963: राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडीचा मारेकरी ली हार्वे ओस्वाल्ड यांचे निधन
2000: भारत आणि चीन दरम्यान असलेल्या प्रत्यक्ष ताबारेषेपैकी ५४५ किमी भागाच्या तपशीलवार नकाशांची प्रथमच देवाणघेवाण करण्यात आल्याचे परराष्ट्रमंत्री जसवंतसिंह यांनी जाहीर केले.
2003: अभिनेत्री, गायिका टुनटुन यांचे निधन.  
2014: माजी केंद्रीय मंत्री, काँग्रेसचे नेते मुरली देवरा यांचे निधन