आंतरवाली सराटी (जि. जालना) : लाखोनं शांततेत मोर्चे काढणाऱ्या मराठा समाजाचे आंदोलन भरकटत चाललं आहे, याचा विचार मनोज जरांगे यांनी करावा, अशी खोचक प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनीही (M  अत्यंत कडक शब्दात मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत सुनावले. पहिल्यांदा तुमच्या वाचाळ लोकांची तोंड आवरा, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फटकारले. 



मनोज जरांगे पाटील काय म्हणाले? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, उलट त्यांच्याच सरकारमधील लोक कार्यालय फोडा म्हणतात. आम्ही आमच्या हक्काचे कुणबी प्रमाणपत्र मागत आहे. मराठा आंदोलनाबाबत तुम्ही पंतप्रधाना बोलले का? केंद्र सरकारने हस्तक्षेप केल्याशिवाय क्युरेटिव्ह पीटिशनची तारीख पडूच शकत नाही. तुम्ही शिर्डीत येऊन काहीच बोलले नाहीत. शिंदे समितीचा अहवाल पुरावे पुरेसा आहे. आता या आंदोलनाचा दुसरा टप्पा आहे. आणखी 6 टप्पे बाकी आहेत, सरकारने धोरणात यावे आणि गांभीर्याने घ्यावं, समितीचे काम बंद करावे असा टोलाही त्यांनी लगावला. 


मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या 'सेनापती'चे डोळे पाणावले


दरम्यान, मराठा आरक्षणासाठी गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांना पाणी पिण्यासाठी शेकडो लोकांनी हात जोडून प्रार्थना केली. यावेळी त्यांनी विनंतीला मान देत पाणी घेण्याची विनंती मान्य केली. मात्र, सरकारला एखादा बळी द्यायचा असेल तर घेऊ द्या, जाणूनबुजून आपल्या समाजाच्या लेकरांवर अन्याय केला जात आहे. न्याय मिळवण्यासाठी, आरक्षण मिळवण्यासाठी एका जणाचा जीव गेला तरी चालेल, पण न्याय मिळला पाहिजे, न्याय मिळण्याचा दिवस जवळ आला आहे, असे बोलताना मनोज जरांगे पाटील यांचे डोळे पाणावले. 


जरांगे आणि टीमने विचार करावा: मुख्यमंत्री


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मराठा आंदोलन भरकटत चाललं आहे, याचा विचार मनोज जरांगे पाटील आणि त्यांची टीम, तसेच सकल मराठा समाजाने करणे गरजेचं आहे. या आंदोलनामध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या प्रक्रियेमध्ये जे नेते आहेत, त्यांना सुद्धा विचार करण्याची वेळ आली आहे. ज्या आत्महत्या होत आहेत त्या का होत आहेत? याचा विचार मराठा समाजातील नेत्यांनी करायला हवा. जे नेते मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, अशा भावनेतून काम करत आहेत, त्यांना गावबंदी करुन, आपआपसात मतभेद होऊ लागले, संघर्ष होऊ लागला तर गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत सहानुभूती आहे, शिस्तीची परंपरा आहे, देशाने शिस्त पाहिली, त्याला गालबोट लागेल. मराठा समाजाबाबत जी सहानुभूती आहे ती कमी होईल, त्यामुळे मराठा आंदोलन यापूर्वी शांततेने झाली त्याला आता गालबोट कोण लावतंय याचा विचार आंदोलनकर्त्यांनी केला पाहिजे, असं मुख्यमंत्री म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या