पुणे : मराठा आंदोलनाला माध्यमांमध्ये प्रसिद्धी मिळत नाही? असे आरोप मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर (Social Media) सुरु आहे. मात्र, मराठा समाजाचे आंदोलन काही माध्यमांमध्ये (News Channel) दाखवले जात नसल्याचे आरोप मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी खोडून काढले आहेत. माध्यमं घाबरणारं व्यासपीठ नसून, त्यांनी सुरवातीपासून मोठ्या ताकतीने आपल्या आंदोलनाला प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे मराठा समाजाने गैरसमज करून घेण्याची गरज नाही, असे जरांगे म्हणाले.
दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की,"मराठा समाजाला माझं आवाहन आहे की, सर्वच न्यूज चॅनलनी आपल्या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात दाखवलं आहे. मराठा आंदोलन दाखवण्यासाठी माध्यमांनी कोणतीही काटकसर केली नाही. कारण प्रामाणिकपणा आणि जे खरं आहे ते सांगितलं पाहिजे. त्यांच्यावर दबाव असेल आणि त्यामुळे ते आपलं आंदोलन दाखवत नाही असे मला वाटत नाही. मराठा समाज सर्वच न्यूज चॅनलवर प्रेम करतात. त्यामुळे एखाद्यावेळी आंदोलन दिसलं नाही म्हणून काहीतरी करायची मराठा समाजाला गरज नाही. सर्वच न्यूज चॅनलच्या पाठीशी मराठा समाज उभा आहे. त्यामुळे मराठा समाजाने मनात काही गैरसमज आणण्याची गरज नाही. माध्यमं ताकतीने मराठा आंदोलन दाखवत आहे आणि पुढेही दाखवतील. माध्यमं घाबरणारं व्यासपीठ नाही. त्यामुळे त्यांना सर्वांनी मिळून साथ द्यायला हवी. असे जरांगे म्हणाले.
सरकारने स्पष्टीकरण द्यावे...
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले की,"मराठा समाज एकत्र आला आहे. संख्या लाखांची आहे. समाज चांगला आशीर्वाद देत आहे. शेतकरी व्यावसायिक आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर आले आहेत. आजपासून मराठा सर्व्हेक्षण होत असून, हे आरक्षण टिकणार आहे का? याच स्पष्टीकरण द्या, आम्ही हे नाकारलेले नाही. 54 लाख लोकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र दिले पाहिजे. अधिकारी सर्व्हेक्षण करतायत ही चांगली गोष्ट आहे. क्युरेटीव्ह पिटीशन आणि मागासलेपण सिद्ध करण्यासाठी हे सगळं सुरू आहे. पण, हे टिकणारे आहे की नाही याबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावे. आरक्षण टिकणारे आहे की नाही हा आमचा जीवन मरणाचा प्रश्न असल्याचे जरांगे म्हणाले.
परवानगी नाकारली ततरीही उपोषण करणार...
दरम्यान, मनोज जरांगे यांच्या उपोषणासाठी मुंबई पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली असून, यावर अजूनही कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, आम्हाला परवानगी देवो अथवा न देवो आम्ही आमरण उपोषणसाठी बसणार आहे. आम्ही कायद्याने परवानगी मागीतीली आहे. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत. छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मला भेटायला आले होते.'ते म्हणाले तुमच्या मागण्या सरकार दरबारी मांडतो. आज माझ्याशी चर्चा केली जाणार आहे, पण कोण भेटायला येणार मला माहित नाही, असेही जरांगे म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या: