एक्स्प्लोर

दोन्ही डोळ्यांनी अंध, स्वतःला अर्धे गाढून घेतलं, मराठा आरक्षणासाठी अनोखं आंदोलन 

सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील जामगाव या गावातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी अर्धसमाधी आंदोलन सुरु केलं आहे.

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावरुन राज्यातील वातावरण चांगलचं तापलं आहे. ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. काही ठिकाणी उग्र स्वरुपाची आंदोलने होत आहेत. अशातच सोलापूर जिल्ह्यातील माढा (Madha) तालुक्यातील जामगाव या गावातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाने मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केलं आहे. विशेष म्हणजे या तरुणाने कंबरेपर्यंत स्वत:ला गाडून घेतलं आहे. मालोजी चव्हाण असं या तरुणाचं नाव आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत 'बेमुदत अर्धसमाधी आंदोलन' सुरू राहणार असल्याचे भूमिका मालोजी चव्हाण यांनी मांडली. 
   
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात जरांगे पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केलीय. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. माढा तालुक्यातील जामगावमधील एका दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या तरुणाने देखील अर्धसमाधी आंदोलन सुरु करत जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच राहणार असल्याची भूमिका मालोजी चव्हाण यांनी घेतली आहे.
दोन्ही डोळ्यांनी अंध, स्वतःला अर्धे गाढून घेतलं, मराठा आरक्षणासाठी अनोखं आंदोलन 

मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास शासन जबाबदार 

महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मराठा समाज आहे. पहिला मराठा कुटंबाकडे भरपूर जमीन होती, हळूहळू लोकसंख्या वाढत गेली. त्याच्यानंतर जमीन कमी होत गेली. यामुळं मराठा समाजातील तरुणांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या मराठा समाजाला शिक्षणात नोकरीत आरक्षण नाही, त्यामुळं तरुण आत्महत्या करत असल्याची प्रतिक्रिया मालोजी चव्हाण यांनी दिली. मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यास शासन जबाबदार असल्याचे मालोजी चव्हाण यांनी सांगितले. सरकारनं आंदोलनाची दखल नाही घेतली तर माझी जीवंत समाधी होईल असे चव्हाण म्हणाले. माझं आंदोलन हे बेमुदत असल्याचे मालोजी चव्हाण यांनी सांगितलं.

मराठा समाजासमोर आता करेंगे या मरेंगे अशी स्थिती

मराठा समाजासमोर आता करेंगे या मरेंगे अशी स्थिती असल्याचे जामगावचे सरपंच सुहास काका पाटील यांनी सांगितले. जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलं आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आमच्या गावातील दोन्ही डोळ्यांनी अंध असलेला तरुण अर्धसमाधी आंदोलन करत असल्याचे पाटील म्हणाले. या लढ्याला सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे. सरकारनं समाजावर ही वेळ आणली न पाहिजे. सरकारनं लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे पाटील म्हणाले. 

मराठा समाजाच्या आरक्षणाला नेतेमंडळी जबाबदार

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाले पाहिजे. समाजाची मागणी रास्त आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाला नेतेमंडळी जबाबदार असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे दिनेश जगदाळे यांनी मांडली. ही लढाई गरजवंत मराठ्यांची आहे. मराठा समाजातील नेत्यांना काही जाण असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा असे जगदाळे म्हणाले. तर मराठा समाजाला सरकारनं कायमच कोडींत पकडले आहे. समाजातील अनेक तरुण मुलांची लग्न होत नाहीत. कोणी मुली द्यायला तयार नाही. विद्यार्थ्यांसमोर विविध समस्या आहेत, त्यामुळं सरकारनं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं असे मत किरण चव्हाण यांनी व्यक्त केले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Maratha Reservation : पंतप्रधान मोदींना गरिबांची गरज नाही हे कळलं, आमची लढाई आम्हीच लढू; जरागेंचा एल्गार

महत्त्वाच्या बातम्या

Sandeep Deshpande: मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
मोदी 'व्हिक्टिम कार्ड'....; विद्यार्थ्यांना माफ करण्याच्या पंतप्रधानांच्या सोशल मिडियावरील व्हिडीओवर संदिप देशपांडे भडकले
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Maharashtra Live blog updates: मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी
Yavatmal Rain Farmar: मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला
मातीच उरली नाही तर शेती करायची कशी? पावसानं पिकांसह सुपीक मातीही खरडून नेली, यवतमाळ जिल्ह्यातील 26 हजार हेक्टरवरील पिके बाधित, बळीराजा रडकुंडीला

व्हिडीओ

Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही
Chandrapur Flood : पुराच्या वेढ्यात चंद्र'पूर', वर्धा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ | Special Report
Amit Thackeray : समोर उत्साह...आणि अमित ठाकरे भाषणच विसरले, का होतेय चर्चा? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India Sri Lanka Tour: टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
टीम इंडियाचे गुरुजी 'गंभीर' पेचात अडकले! 'श्रीलंकेत करो वा मरो'ची स्थिती, गिलसाठी सुद्धा वाट खडतर
Khadakwasla Dam : पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
पुणेकरांना दिलासा! खडकवासला अन् वरसगाव धरणं फुल भरली; मुठा नदीत विसर्ग सुरू
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
तमिळनाडू सीएम थलापती विजय यांच्याविरोधात 2031 मध्ये भिडू आत्ताच ठरला? विजय यांच्या ज्योतिषानेच केली भविष्यवाणी! म्हणाले, यांच्यामध्येच थेट टक्कर होणार
Abhijeet Dipke: 'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
'अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीची चौकशी करा, मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी पैसा कसा पुरवला?' निवडणूक आयोगासह टॅक्स अधिकाऱ्यांना सुद्धा कोणी लिहिलं पत्र?
Ambernath Shiv Sena News: 'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
'आमदार संध्याकाळी फार्म हाऊसवर जाऊन बसतात'; अंबरनाथमध्ये शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस पुन्हा उफाळली, शहरप्रमुखांची आमदार किणीकरांवर बोचरी टीका
Maharashtra Freedom of Religion Act 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा राज्यात लागू; कायद्याचे उल्लंघन केल्यास सात वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद
Delhi Jantar Mantar protests: जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
जंतर मंतरवरील आंदोलनाबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप, 'हे आंदोलन देशविरोधी होतं, संविधानविरोधात...'
Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Embed widget