Maratha Reservation Live Updates : मराठा आरक्षण वैध की अवैध? आज सुनावणी, सर्वोच्च न्यायालय देणार महत्त्वाचा निकाल

Maratha Reservation News : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

एबीपी माझा ब्युरो Last Updated: 06 Dec 2023 02:58 PM
Maratha Reservation Live Updates : मनोज जरांगे यांच्या सभेची जय्यत तयारी 
Maratha Reservation Live Updates : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची नांदेडच्या नायगाव तालुक्यात 55 एकर जागेवर विराट सभा संपन्न होणार आहे. या सभेची सध्या जय्यत तयारी सुरू असून, या सभेसाठी सीमावर्ती भागासह उमरी, धर्माबाद, बिलोली, देगलूर, मुखेड आणि नायगाव या सहा तालुक्यातील सकल मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे. यासाठी 55 एकर परिसरामध्ये बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. दहा एलईडी स्क्रीनद्वारे या सभेचे थेट प्रक्षेपण होणार असून, 3000 लाऊड स्पीकरची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेदरम्यान 70 हजार मराठा समाज बांधवांना मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तर एक लाख बांधवांना ओबीसी समाज बांधवांकडून भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे.

 
Manoj Jarange on Maratha Reservation : आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल - मनोज जरांगे

Manoj Jarange on Maratha Reservation : आरक्षण दोन दिवस उशिराने मिळालं तरी चालेल, असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. यानंतर जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठीची डेडलाईन बदलली का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

Manoj Jarange Patil News : आज यवतमाळमध्ये मनोज जरांगेंची सभा

Maratha Reservation Live Updates : विदर्भ दौऱ्यावर असलेल्या मनोज जरांगेंची आज यवतमाळमध्ये सभा आहे. त्यानंतर जरांगेंची पुसदमध्ये ओबीसी नेत्यांसोबत बैठक होणार आहे.

Maratha Reservation Live Updates : महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची दिल्लीत बैठक

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation)  दिल्लीमध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत. आता छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) महाराष्ट्रातील सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी दिल्लीत एकत्र येण्यासाठी एका बैठकीचे आयोजन केले आहे.  मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला बळकटी मिळवण्यासाठी ही बैठक महत्वाची असल्याचा उल्लेख करत सर्व खासदारांना संभाजीराजेंनी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे

Maratha Reservation Live Updates : क्युरेटिव्ह याचिकेवर मराठा आरक्षणाचं भवितव्य, आज सुप्रीम कोर्टात सुनावणी

Supreme Court Live Updates : Supreme Court Hearing on Maratha Reservation : आज मराठा आरक्षणासाठी महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या सुनावणीवर मराठा आरक्षणाचं भवितव्य ठरणार आहे. मराठा आरक्षण (Maratha Reservation) वैध की अवैध यावर आज सुनावणी होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं (Maharashtra Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पीटिशनवर (Curative Petition) आज महत्त्वाची सुनावणी पार पडणार आहे. दुपारी दीड वाजेच्या सुमारास सुनावणीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Maratha Reservation Curative Petition : आज मराठा आरक्षणाचा फैसला होणार

Curative Petition on Maratha Reservation : सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने 5 मे 2021 रोजी मराठा आरक्षण रद्द केलं होतं. याचा पुनर्विचार करण्याच्या राज्य सरकारच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

पार्श्वभूमी

Maratha Reservation Supreme Court Hearing Live Updates : मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.