एक्स्प्लोर

Ajit Pawar : मराठा आरक्षण दिल्याशिवाय दौरे कसे करता?  भर सभेत अजित पवारांना दाखवले काळे झेंडे, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात 

अजित पवार बोलताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका आंदोलकाने काळा झेंडा दाखवत अजित पवार यांचा निषेध केला.

Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज माढा तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्यावर ऊसाची मोळी पुजनाचा कार्यक्रम अजित पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अजित पवार यांची सभा झाली. दरम्यान, अजित पवार बोलताना प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका आंदोलकाने काळा झेंडा दाखवत अजित पवार यांचा निषेध केला. मराठा आरक्षण दिल्याशिवाय कसे दौरे करता? असा संतप्त सवाल या आंदोलकाने केला आहे. सोमा गायकवाड असे या आंदोलकाचे नाव आहे. दरम्यान, पोलिसांनी या आंदोलकाला ताब्यात घेतलं आहे. 

मराठा आंदोलनाच्या मुद्यावरुन दिवसेंदिवस राजकारण तापत चाललं आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केली जात आहेत. नेत्यांना गावबंदी, तालुकाबंदी केली जात आहे. अशातच अजित पवार यांच्या माढा दौऱ्यालाही मराठा संघटनांनी विरोध केला आहे. 

शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी 8 हजार कोटी सरकारने भरले 

सत्तेत असताना काय केले ते विरोधात गेल्यावर कसे विसरता ? असे म्हणत खासगी नोकरभरतीच्या मुद्द्यावरुन अजित पवारांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी 8 हजार कोटी सरकारने भरले आणि नुकसान भरपाई 54 हजार कोटी मिळेल असे पवार म्हणाले. सत्तेवर नसणाऱ्यांकडून बदनामी करायचा प्रयत्न सुरु आहेत. आम्ही आमच्या जिल्ह्यात चांगल्या संस्था चालवून दाखविल्या आहेत. नाशिक येथील सह्याद्री फार्म पाहिला, माळावर नंदनवन केले आहे. शालेय पोषण आहारात बेदाण्यासाठी लवकरच बैठक बोलावणार असल्याचे अजित पवार म्हणाले. 

माणूस कधी समाधानी राहत नाही

उजनीत अनेकांच्या जमिनी गेल्या आहेत. त्याचा फटका पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्याला बसला आहे. धरणासाठी मात्र कोणाची जमीन गेल्याशीवाय इतरांना जमीन ओलीतासाठी येत नसल्याचे अजित पवार म्हणाले. माणूस कधी समाधानी राहत नाही. अजून पाहिजे अजून पाहिजे सुरु असते. आता विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची 15 हजार मेट्रिक टन क्षमता असताना आता 20 हजार विस्तारीकरणाची मागणी केल्याचे अजित पवार म्हणाले. कोल्हापूरवाले 1 टनातून 135 ते 140 किलो साखर काढतात. माझ्याकडे 12 रिकव्हारी, काही पठ्ठे 10 रिकाव्हारी दाखवतात त्यांची तपासणी केली पाहिजे असे पवार म्हणाले. 1 टक्के साखर कमी निघाली तर 10 किलो साखर कमी होत. केंद्राने रीकव्हरी जोडून एफआरपी ठरवली आहे. याचा विचार करावा असे अजित पवार म्हणाले. 1991 साली राजकारणात आलो तेव्हा साडेपाच टीएमसी पाणी लागायचे आता लागते 19 टीएमसी पाणी लागत असल्याचे पवार म्हणाले. टाटाच्या धरणातील 25 टीएमसी पाणी मिळाले तर किती तरी प्रश्न सुटतील असे ते म्हणाले. दरम्यान, सरकारमध्ये असताना कामे जास्त होतात. वंचित लोकांची बहुजनांची कामे होतात असे अजित पवार म्हणाले. 

महत्त्वाच्या बातम्या:

Ajit Pawar: स्वत:ला मराठा समजणारे अजित पवार आरक्षणापासून दूर का पळतायत? संजय राऊतांचा सवाल

महत्त्वाच्या बातम्या

ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 जुलै 2026 | बुधवार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Tukaram Mundhe : विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
विद्यार्थ्यांचा पोषण आहार सकस आणि दर्जेदारच हवा, तुकाराम मुंढेंनी आता शाळांकडे मोर्चा वळवला!
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MAB: बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, खासगी बँकांमध्ये एचडीएफसी बँक आघाडीवर
बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम न ठेवल्यानं ग्राहकांकडून बँकांची 26170 कोटींची वसुली, राज्यसभेत आकडेवारी सादर
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
ठाकरेंचे आमदार दिलीप सोपल उपसभापतींना भेटले; सचिन अहिर म्हणाले, आम्ही 13 खासदारांना घेऊन पंतप्रधानांना भेटणार
Delhi Police: दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
दिल्ली पोलिसांनी 'X' ला पंतप्रधानांवरील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्यास सांगितलं; पोस्ट करणाऱ्या व्यक्तीचे नाव, पत्ता, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी सुद्धा मागितला
Bhopal Farmer Protest: आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
आता शेतकऱ्यांचा एल्गार, भोपाळमध्ये अर्धनग्न आंदोलन; शेतकऱ्यांनी पोलिसांचे चार थरांचे बॅरिकेड्स तोडले Gen-Z चा सुद्धा पाठिंबा, रस्त्यावर डाळ बाटी करून खाल्ली, मुख्यमंत्री निवासस्थानावर मोर्चा
Public Examinations (Prevention of Unfair Means) Act, 2024: लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
लोकसभेत पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर कायदा मंजूर, 7 वर्षांचा तुरुंगवास अन् १० कोटींच्या दंडाची तरतूद
Share Market: भारतीय शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
सेन्सेक्स 900 अंकांनी वधारला, निफ्टी 24 हजारांच्या पुढे, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी कमावले
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
लोकसभेतील गदारोळात राज्यसभेत विधेयक मंजूर; आता, 'वंदे मातरम'चा अवमान फौजदारी गु्न्हा, काय होईल शिक्षा?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
गुरुपौर्णिमेनिमित साईभक्ताचं गुप्तदान, शिर्डीत भाविकांची मांदियाळी; सोन्याचा हार, दोन दिवसांत किती दान?
Embed widget