एक्स्प्लोर

वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणारे 18 जण मराठेतर

वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणात गुंतलेले 18 तरुण हे मराठेत्तर समाजाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

औरंगाबाद: वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणात गुंतलेले 18 तरुण हे मराठेत्तर समाजाचे असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजे आंदोलकांमध्ये काही समाजकंटक घुसले असल्याच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. आतापर्यंत या प्रकरणी एकूण 47 जणांना ताब्यात घेतलं असून, त्यातल्या 37 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे या 37 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे अटकेतील 18 जण हे मराठेतर समाजातील आहेत. मराठा आंदोलनादरम्यान  9 ऑगस्ट रोजी ओरंगाबादमधील वाळूज एमआयडीसीत आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. त्यात अनेक कंपन्यांचं मोठं नुकसान झालं. नवा व्हिडीओ वाळूजमध्ये झालेल्या विध्वंसाचा नवा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. वाळूजमधल्या एमआयडीसीमध्ये घुसलेल्या आंदोलकांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कसा धुडगूस घातला याचा पुरावा देणारा हा व्हीडिओ पोलिसांकडेही देण्यात आलेला आहे.  त्यामुळे त्यातल्या चेहऱ्यांना हेरून त्यांची धरपकड सुरु झालेली आहे. VIDEO:  आमदार हर्षवर्धन जाधवांचा आरोप औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तोडफोड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सप्लाय चेनमधील लोक आणि परप्रांतियांनी केली असून, त्याचं बिल मराठा आंदोलकांवर फाडलं जातंय, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसेच, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी स्वतःचे प्रायव्हेट इश्यूज सेटल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव काल जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. वाळूज तोडफोड प्रकरण वाळूज एमआयडीसीतील 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, 60 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतलं असून, 37 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी  वाळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली. संबंधित बातम्या बंद कंपन्यांमध्ये तोडफोड केल्याप्रकरणी औरंगाबादेत 41 जण अटकेत   वाळूज एमआयडीसी तोडफोडीचे पंचनामे, 60 कोटीचं नुकसान, धरपकड सुरुच 

महत्त्वाच्या बातम्या

..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
राज्यातील 16 लाख 96 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ, अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक पात्र शेतकरी, सहकार आयुक्तांची माहिती 
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी

व्हिडीओ

Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती
Aditya Thackeray On Fadnavis : सीईटी परीक्षेबाबत मुख्यमंत्र्यांनी माध्यमासमोर येऊन उत्तर द्यावं
Sharad Pawar On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं भाष्य; काय म्हणाले?
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident Case : आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे
Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Karja Mafi Scheme : पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
पहिल्या टप्प्यात कर्जमाफीसाठी मराठवाड्यात किती शेतकरी पात्र? पाहा संपूर्ण यादी
Arvind Sawant : जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
जंतर मंतरवर ठिणगीचं रुपांतर ज्वालामुखीत झालं, विद्यार्थ्यांनी संविधान आणि तिरंगा हाती घेत लढा दिला : अरविंद सावंत
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा, सौरव दास यांनीही दिला सुप्रीम कोर्टाचा दाखला
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
पुणे विद्यापीठातून बोगस पदवी प्रमाणपत्र; 3 लाख रुपयांत बी.कॉम सर्टिफिकेटचा सौदा, रिक्षावाल्याच्या दाव्याने खळबळ
L&T Q1 Results: एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
एल अँड टीची पहिल्या तिमाहीत दमदार कामगिरी, निव्वळ नफा 4123 कोटींवर,शेअरमध्ये तेजी येणार?
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
भरधाव ट्रकची धडक; दुचाकीवरील दोन महिला जागेवरच ठार, अपघाताच्या भीषण घटनेनंतर वाहनांच्या रांगाच रांगा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 जुलै 2026 | मंगळवार
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
नागपुरात पावसाची जोरदार एंट्री, उद्या शाळांना सुट्टी; विदर्भात पुढचे तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा
Embed widget