एक्स्प्लोर

अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील: मराठा क्रांती मोर्चा

आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

सांगली: पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठा आरक्षणाचा निर्णय द्यावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध सुटेल, मुके मोर्चे बोलके होतील, असा गर्भित इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला. सांगलीत काल पार पडलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा इशारा देण्यात आला. यावेळी आरक्षणासोबतच इतर मागण्यांबाबतही सरकारने कालमर्यादा निश्चित करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याशिवाय भीमा कोरेगाव दंगलीत हत्या झालेल्या राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांच्या अटकेच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही जाहीर करण्यात आले. राज्यभरातील कार्यकर्त्यांची बैठक सांगली -मिरज रोडवरील भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात काल मराठा क्रांती मोर्चाची राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीसाठी विविध जिल्ह्याच्या प्रमुख नेत्यांनी आज हजेरी लावली होती. राज्य सरकारने मराठा समाजाच्या महामोर्चानंतर शैक्षणिक सवलत वगळता इतर एकही आश्‍वासन पूर्ण केलेले नाही. अन्य आश्वासन पूर्तता होईल, असे पाऊल अद्याप उचलले गेले नाही. त्यामुळे समाजात सरकारविरुद्ध असंतोष खदखदतोय. आणि तो सरकारला दाखवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची तयारी केली पाहिजे, असे मत यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या मराठा क्रांती मोर्चा समन्वयक आणि नेत्यांनी व्यक्त केला. अधिवेशनापूर्वी आरक्षण द्या, अन्यथा मूक मोर्चे बोलके होतील: मराठा क्रांती मोर्चा कोपर्डीतील बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर उद्‌भवलेली स्थिती, मराठा समाजाच्या अडचणी, शेतकरी प्रश्‍नावर समाजाने एकत्र लढण्याची गरज यावरही सविस्तर चर्चा करण्यात आली. अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांना कर्जपुरवठा करण्यास बँका नकार देत आहेत. अशा बँकांविरुद्ध आंदोलन करावे,अशी मागणीही यावेळी अनेक वक्त्यांनी केली. बैठकीनंतर मराठा क्रांती मोर्चाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी राज्य सरकारने मराठा आरक्षण निर्णय जाहीर करावा, अन्यथा मराठा समाजाचा संयमाचा बांध फुटेल. आतापर्यंत मुके निघालेले मोर्चे यापुढे बोलके आणि आक्रमक मोर्चे होतील. त्यामुळे पावसाळी अधिवेशनापूर्वी मराठ्यांना आरक्षणाचा निर्णय घ्यावा, असा इशारा देण्यात आला. भीमा कोरेगाव दंगलीमध्ये मृत्यू झालेल्या राहुल फटांगडे यांच्या कुटुंबाला राज्य सरकारने ५० लाख रुपये आर्थिक मदत द्यावी. तसंच राहुलच्या मारेकऱ्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी 9 जुलै रोजी पुणे येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. एक जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा हिंसाचारात राहुल फटांगडेचा मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी अहमदनगरच्या श्रीगोंदा इथून 3 आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी एका आरोपीला अटक केली आहे. तर चार आरोपींची रेखाचित्र पोलिसांनी जारी केली आहेत. संबंधित बातम्या  राहुल फटांगडेच्या मारेकऱ्यांचं छायचित्र जारी  

महत्त्वाच्या बातम्या

थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
थोड्याच महिन्यात सत्ता बदलणार, आमच्या मातीसाठी, संविधानासाठी लढत राहणार, आदित्य ठाकरेंचा एल्गार
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Video: अभिजित दिपकेंच्या गंभीर आरोपानंतर दिल्ली पोलिसांकडून 100 सेकंदाचा लाव रे तो व्हिडिओ; दिपकेंचा सुद्धा पलटवार, म्हणाले तो भाग तुम्ही डिलीट का केला? ट्विट वाॅर रंगलं
Mumbai Protest: ज्युनिअर ठाकरे मैदानात, शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
ज्युनिअर ठाकरे मैदानात,शिवसेनाभवनाबाहेर आदित्य-तेजसचा ठिय्या, शिवाजी पार्कात अमित ठाकरेंसह मनसे आक्रमक
Rahul Gandhi: 'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
'आम्हाला असा भारत नको..' इंडियाचा आघाडीचा अभूतपूर्व निर्णय, थेट सुप्रीम कोर्टावर मोर्चा धडकणार; राहुल गांधी म्हणाले, 'हा राजकीय पक्षांचा मोर्चा नाही, तर..'
Abhijeet Dipke: 'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
'आजी वारल्यानंतर फोन सुद्धा दिला नाही, पहाटे साडे तीन वाजता दिल्ली पोलिस मला म्हणाले..' अभिजित दिपकेंनी धक्कादायक घटनाक्रम सांगितला
Mumbai Protest Aaditya Thackeray and Amit Thackeray: अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
अखेर मुंबईत आंदोलनाचा वणवा भडकला, ठाकरेंची त्रिमूर्ती रस्त्यावर उतरली अन् बघता बघता वातावरण पालटलं, दादरमध्ये नेमकं काय घडलं?
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Embed widget