मुंबई : मनसुख हिरेन यांचा शवविच्छेदन अहवाल आला मात्र त्यातून हिरेन यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. त्यामुळे आता केमिकल ॲनालिसिस अहवालातूनच मनसुख यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. केमिकल ॲनालिसिस अहवाल हा अतिशय महत्वाचा अहवाल मानला जातो, यामध्ये काही घातपात झाला असेल तर स्पष्ट कळून येतं.


शवविच्छेदनाच्या अहवाल मधून जर मृत्यूचे कारण स्पष्ट झालं नाही, किंवा मृत्यू हा कसा झाला किंवा कशामुळे झाला हे स्पष्ट झालं नाही तर केमिकल ॲनालिसिस अहवाल केला जातो.


केमिकल ॲनालिसिस अहवालमध्ये दोन महत्वाचे केंद्र बिंदू असतात. पहिलं म्हणजे मृत व्यक्तीची विसरा चाचणी केली जाते. विसरा शरीरातील आतल्या अवयवांची चाचणी केली जाते, ज्यामध्ये कुठले विषारी द्रव्य दिलं आहे का याची चाचणी होते. जर शरीरात विष सापडलं नाही तर विष देऊन मारण्याची शक्यता पूर्णपणे संपून जाते.


तसेच जर विष दिल असेल तर कुठल्या प्रकारचा विष दिलं? किती प्रमाणात दिलं? त्या विषात कुठल्या प्रकारचे केमिकल्स वापरले गेले आहेत? त्या केमिकल्सचा वापर कुठे-कुठे केला जातो या सर्व प्रश्नांची उत्तरं विसरा अहवालमध्ये मिळत.


Mansukh Hiren | मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी गृहमंत्र्यांची पोलिस अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक


तर दुसरी महत्त्वाची बाजू म्हणजे फुफ्फुसामध्ये पाणी गेलं आहे. जिथे मृतदेह सापडला, ते पाणी त्या खाडीचंच पाणी आहे का किंवा अजून कुठलं पाणी आहे आणि ते किती प्रमाणात आहे याचाही तपास केला जाणार आहे. म्हणून जिथे मृतदेह सापडला त्या ठिकाणाचे पाण्याचे नमुने आणि शरीरात सापडलेल्या पाण्याची चाचणी केली जाते आणि हे दोन्ही पाण्याचे अहवाल जुळतात का ते केमिकल अॅनालिसिस रिपोर्ट मध्ये स्पष्ट होतं.


जर दुसरीकडे बुडवून मारलं गेलं असेल आणि नंतर खाडीमध्ये आणून मृतदेह टाकला असेल तर त्या ठिकाणंच पाणीसुद्धा फुफ्फुसामध्ये जास्त प्रमाणात सापडत.


केमिकल ॲनालिसिस अहवाल यायला काही कालावधी लागणार आहे. अस तर हा अहवाल यायला महिन्यांचा कालावधी लागतो मात्र प्रकरणाची गंभीरता पाहता पोलीस आयुक्त या प्रकरणाचा अहवाल लवकरात लवकर मिळण्यासाठी फॉरेन्सिक डिपार्टमेंटला विनंती अर्ज करू शकतात.


ख्वाजा युनूसच्या मृत्यूनंतर एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांचं आयुष्यचं बदलून गेलं..