मुंबई: वसईच्या गौराईपाडा येथे मंगळवारी  रोहित रामनिवास यादव (वय 29) या तरुणाने मंगळवारी भररस्त्यात आरती रामदुलार यादव (वय 22) हिची निर्घृणपणे हत्या (Vasai Girl Murder) केली. रोहितने लोखंडी पान्याने आरतीवर तब्बल 15 वेळा घाव घातले. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. सकाळी साडेनऊनच्या सुमारास ही घटना घडली तेव्हा रस्त्यावर अनेकजण होते. मात्र, यापैकी कोणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही. या सगळ्या घटनेविषयी संताप आणि चीड व्यक्त होत असतानाच आता आरती यादव हिच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. 


स्वत:ची रुम घे, मुलीचं लग्न लावून देतो, मुलीच्या वडिलांची अट


आरती यादव हिच्या कुटुंबीयांशी 'एबीपी माझा'ने संवाद साधला. त्यावेळी आरतीच्या वडिलांनी सांगितले की, मी रोहित यादवला सांगितले होते की, तू स्वत:ची रुम घे. मी मुलीचं तुझ्याशी लग्न लावून देतो. तुझ्याकडे काही असल्याशिवाय मी तुझं लग्न लावून देणार नाही. त्यासाठी मी त्याला रुम घ्यायला सांगत होतो. पण रोहित म्हणाला की, माझी ऐपत नाही, मी रुम विकत घेऊ शकणार नाही. नंतर तो म्हणाला, मी माझं बघतो, तुम्ही तुमचं बघा. त्यामुळे मला वाटलं हा विषय संपला. पण त्यानंतर 8 जूनला रोहितने आरतीला मारहाण केली. आम्ही पोलीस चौकीत तक्रार घेऊन गेलो तर पोलीस म्हणाले की, काही होणार नाही, असे आरतीच्या वडिलांनी सांगितले. 


ओक्साबोक्शी रडत आई म्हणाली, "मुझे जान के बदले जान चाहिए"


आरती यादवाच्या कुटुंबीयांशी 'एबीपी'ने संवाद साधला तेव्हा तिची आई ओक्साबोक्शी रडत होती. तिने म्हटले की, "मुझे जान के बदले जान चाहिए". तरच आरतीला न्याय मिळेल. जीव घेतल्याशिवाय आरतीला न्याय मिळणार नाही,  असे आरतीच्या आईने म्हटले. 


पोलीस रोहितला मराठीत बोलले, पैसे दे, मामला रफादफा करतो; आरतीच्या बहिणीचा गंभीर आरोप


यावेळी आरती यादवच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केला. 8 जूनला आरतीला रोहितने मारहाण केल्यानंतर आम्ही पोलीस चौकीत गेलो होतो. तेव्हा तेथील एक पोलीस अधिकारी रोहितला मराठीत बोलला, 'चल पैसे दे, मामला रफादफा करतो'. पोलिसांनी त्याच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. मी पोलीस स्टेशनमध्ये येऊन तो कोण पोलीस अधिकारी होता, हे तुम्हाला दाखवेन, असे आरतीच्या बहिणीने म्हटले. आरती यादवच्या बहिणीने पोलिसांवर केलेल्या या गंभीर आरोपामुळे एकच खळबळ उडाली होती. रोहित यादवकडून पैसे मागणारा अधिकारी कोण होता? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रोहित यादवला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जान के बदले जान चाहिए, तेव्हाच शांती मिळेल, असे सानिया यादव हिने म्हटले. 


आणखी वाचा


क्यों किया ऐसा मेरे साथ? लोखंडी पान्याचे 15 घाव घालून प्रेयसीला संपवलं, नागरिक मोबाईल शुटिंगमध्ये बिझी