छत्रपती संभाजीनगर:  ओबीसी नेते (OBC Reservation)  लक्ष्मण हाकेंच्या (Laxman Hake)  आंदोलनावर मनोज जरांगेंनी (Manoj Jarange)  टीका केली आहे. ओबीसी आंदोलन सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. आरक्षण (Maratha Reservation) घेतल्याशिवाय आंदोलन सोडणार नसल्याच मनोज जरांगेंनी यावेळी सांगितलंय. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते. तसेच एकाही तरूणाने आरक्षणासाठी आत्महत्या करू नका, अशी विनंती देखील  मनोज जरांगेंनी केली आहे. 


मनोज जरांगे म्हणाले, भारतात लोकशाही आहे त्यामुळे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. त्यांची मागणी ते करतात मी माझ्या समाजावर ठाम आहे. ते दिशाभूल करत आहेत.  दिशाभूल करायची ती करू द्या.त्यांना आरक्षण संविधानाने दिले आहे. SC ST ला धक्का लागणार नाही त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे.त्याचं आंदोलन सरकार पुरस्कृत आंदोलन आहे. आधीचे आणि आताचे आंदोलन पाहिल्यावर लक्षात येत आहे. आंदोलनाला एवढे लोक येतात त्यावरुनच  लक्षात येते. आंदोलकांना मी काही म्हणत नाही मात्र हे सरकार घडवून आणत आहे.


माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही : मनोज जरांगे


लक्ष्मण हाकेच्या आंदोलनावर मनोज जरांगे म्हणाले,  माझा त्यांच्या आंदोलनाला विरोध नाही. मी त्यांच्यावर उत्तर देणार नाही. मी किती वेळेला पाडा म्हणालो ते सांगा. आम्ही जेवढे दिवस म्हणतो विरोध नाही तर तुम्ही आता जास्त करत आहात. 


मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका : मनोज जरांगे


मराठा तरुणाच्या आत्महत्येवर मनोज जरांगे म्हणाले, राज्यातील तरुणांना हात जोडून विनंती की कधी न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. नंबर लागला नाही आत्महत्या करू नका. पुन्हा प्रयत्न करा,काही दिवसांनी तुम्हाला आरक्षण मिळणार तेव्हा पुन्हा प्रयत्न करा . मी आरक्षण मिळवून देणार आहे.  आरक्षण मिळाल्यावर इच्छा पूर्ण होणार. नोकरी हुकली तरी चालेल मात्र  तुमचा जीव महत्वाचा आहे. तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे. काळजी करू नका. तुम्हाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी हटत नाही.पुढील दिवसात तुम्हाला आरक्षण असेल .  मराठ्यांच्या पोरांनी जीव देऊ नका.  


मराठा आंदोलकाची आत्महत्या


एका मराठा आंदोलकाने आयुष्याची अखेर करुन घेतल्याची माहिती समोर आली आहे. प्रसाद देठे (Prasad Dethe) असे या तरुणाचे नाव आहे. मूळचे बार्शीतील असणारे प्रसाद देठे पुण्यातील एका खासगी कंपनीत काम करत होते. त्यांनी मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी त्यांनी बुधवारी सकाळी आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत प्रसाद देठे यांनी आपल्या मनातील व्यथा मांडली आहे. 


Video :



हे ही वाचा :


Maratha Reservation: चिऊ मला माफ कर, जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका; मराठा आंदोलकाने आयुष्य संपवलं