मुंबईलोकसभेच्या पराभवासाठी (Lok Sabha Election )  महायुतीकडून (Mahayuti)  अजितदादांचा (Ajit Pawar)  बळीचा बकरा करण्यात आला आहे.  तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात आला, असे वक्तव्य  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे (Sharad Pawar)  आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar)  केले आहे.  रोहित पवारांनी  अजित पवारांसह भाजपवर हल्लाबोल केला आहे.  दादांना वेगळे होण्यास भाग पाडायचं ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडल्याची चर्चा आहे.  भाजपचा पराभव केवळ दादांमुळे नाही तर भाजपच्याच चुकीच्या धोरणांमुळे झालाय, असेही रोहित पवार म्हणाले.


रोहित पवार म्हणाले, महाविकास आघाडीच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे.  तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो,  असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे.






भाजपचा पराभव शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे: रोहित पवार


 मुळात भाजपचा पराभव केवळ अजितदादांमुळे झालेला नाही तर भाजपच्याच शेतकरी, युवा विरोधी धोरणांमुळे झालेला आहे. भाजप नेत्यांच्या अहंकारामुळे, जनतेला गृहीत धरून चालण्याच्या वृत्तीमुळे, पक्ष फोडण्याच्या कृत्यांमुळे, महाराष्ट्राच्या अस्मितेशी छेडछाड केल्यामुळे झालेला आहे. त्यामुळे अजितदादांना वेगळे करून तिरंगी लढती करून उपयोग नाही. शेतकरी, युवा यांना गृहीत धरून चालणाऱ्या, मराठी स्वाभिमान गहाण टाकून महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवणाऱ्या भाजपला धडा शिकवल्याशिवाय हा महाराष्ट्र शांत बसणार नाही, याची दखल चाणक्यांनी घ्यायला हवी.


हे ही वाचा :


 यापुढे अजित पवारांच्या राष्ट्रवादीसाठी भाजपचा कार्यकर्ता काम करणार नाही, माढ्यात बंडाचं निशाण फडकलं