भुजबळांच्या नादात फडणवीस सत्ता घालवून बसणार, दरेकर हे खवाट भूत, जरांगे पाटलांचा जोरदार हल्लाबोल
छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नादात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही सत्ता घालवून बसणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.
Manoj Jarange Patil : छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) नादात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तुम्ही सत्ता घालवून बसणार असल्याचे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. पाडायचे की उभे करायचे ते ठरवू, पण तुमचा कार्यक्रम आम्ही करु असेही जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) म्हणाले. दरेकर हे लय खवाट, डेंजर भूत असल्याचे जरांगे म्हणाले. हे त्रासलेलं मराठा द्वेषाच भूत मराठा संघटना फोडत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. मराठ्यांची शक्ती काय असते ते आम्ही दाखवू थोडा संयम दाखवा असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.
आता यांची खुर्ची ठेवायचं नाही
सरकारनं पक्क ठरवलं आहे की, मराठ्यांना आरक्षण द्यायचे नाही. त्यामुळं मराठ्यांनी देखील ठरवलं आहे की, यांना आता खुर्ची ठेवायचं नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला आहे. आम्ही सरकारला आणखी 29 तारखेपर्यंत वेळ दिला असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजामध्ये यांच्याविषयी प्रचंड चीड आहे. त्यांची खदखद बाहेर पडणार आहे.
आमचा जीव आरक्षणात त्यांचा जीव खुर्चीत
तुम्ही जर आरक्षण देणार नसाल तर आम्हाला राजकीय भाषा वापरावी लागेल. मंत्री शंभुराज देसाई आले त्यावेळी शेवटची चर्चा झाली. त्यानंतर सरकारशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे मनोज जरांगे पाटील महणाले. आमचा जीव आरक्षणात त्यांचा जीव खुर्चीत, त्यांची खुर्ची आम्ही घालवणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. काय व्हायचं ते होऊद्या असेही जरांगे पाटील म्हणाले. फडणवीसांना आणखी किती दिवस मराठ्यांना वेठीस धरायचे आहे ते बघू असेही जरांगे पाटील म्हणाले.
29 ऑगस्टला आम्ही कोणाला पाडायचं की निवडून आणायचं याबाबतची निर्णय घेऊ
दरम्यान, 29 ऑगस्टला आम्ही कोणाला पाडायचं की निवडून आणायचं? याबाबतचा निर्णय घेणार आहोत. सर्व समाजाशी चर्चा करुन हा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, मराठा समाजील इच्छुकांनी आपापली कागदपत्रे काढून ठेवावीत असे देखील जरांगे पाटील म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचंच नाही. त्यामुळं आता आम्ही त्यांची खुर्ची घालवणार अल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या: