Manoj Jarange Parbhani: परभणीत मराठा आरक्षण शांतता रॅलीची जय्यत तयारी, ठिकठिकाणी मनोज जरांगेंचे फ्लेक्स, वाहतूकीतही केला बदल
परभणी शहरात ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचे 30 फूट उंचीचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आलाय.
Parbhani news: मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या मराठा शांतता जनजागरण रॅलीची तयारी आता पूर्ण झाली आहे. उद्या परभणीत या रॅलीचे (Maratha Reservation Rally) आयोजन करण्यात आले असून शहरात ठिकठिकाणी मनोज जरांगे यांचे 30 फूट उंचीचे फ्लेक्स उभारण्यात आले आहेत. शहरात वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून (6 जुलै) मराठा आरक्षण शांतता रॅली सुरू केली असून हिंगोलीतून मराठा आरक्षण शांतता जनजागरण रॅलीला सुरुवात झाली आहे. सगेसोयऱ्यांसह मराठा आरक्षण मिळाले पाहिजे, या मागणीवर मनोज जरांगे ठाम असून याबाबत त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे.
परभणीत उद्या मराठा शांतता जनजागरण रॅली
परभणी शहरातील नूतन महाविद्यालयाच्या मैदानापासून मराठा शांतता जनजागरण रॅली निघणार असून शहरातील मुख्य बाजारपेठेतून छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या रॅलीचा समारोप होणार आहे. याच ठिकाणी मनोज जरांगे मराठा आंदोलकांना संबोधित करणार असून परभणीत या रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
परभणी शहरात मनोज जरांगे यांचे 30 फूट उंचीचे फ्लेक्स लावण्यात आले आहेत. शहरातील वाहतुकीतही मोठा बदल करण्यात आला आहे.
हिंगोलीतून मनोज जरांगे काय म्हणाले?
दरम्यान हिंगोलीतून निघालेल्या मराठा शांतता जनजागरण रॅलीत मराठा कुणबी एकच आहेत. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्याची जबाबदारी तुमची आहे असे म्हणत या रॅलीतून त्यांनी जोरदार टीकास्त्र डागले आहे.
हिंगोलीच्या मराठ्यांनी मराठ्यांची शान राखली आहे. ज्या ज्या वेळी मराठ्यांवर संकट येतील, त्या त्या वेळेस हिंगोली जिल्हा ताकदीने उभा राहील. माझं राज्य सरकारला जाहीर सांगणे आहे की, मराठा समाजाचा हा आक्रोश आहे. मराठा समाज स्वतःच्या न्यायासाठी रस्त्यावर आलाय.
हेही वाचा: