Pune Crime news :  तीन-तीन लग्न होऊनही (Crime news) तिन्ही बायका नांदत नव्हत्या. याच नैराश्यातून एका व्यक्तिनं आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील पारगाव गावाजवळ असणाऱ्या पहाडदरा येथे ही घटना घडली आहे. शेखर शांताराम पवार (28) वर्षीय आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. काही दिवसांपासून शेखर बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती. त्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आता उघड झाले आहे.  शांताराम गेनु पवार असं त्याच्या वडिलांचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेखर पवार यांना तीन पत्नी होत्या. ते पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्याचा रहिवासी आहे. काही कामानिमित्त तो आंबेगाव तालुक्यातील पारगाव राहत होता. शेखर यांची तीन लग्न झाली होती. त्या तिन्ही पत्नी त्याच्याबरोबर नांदत नव्हत्या. या कारणामुळे त्यांच्या कुटुंबात नाराजीचं वातावरण होतं. अशा वातावरणामुळे तो नैराश्यात गेला. त्यामुळे काही दिवसांपूर्वी त्याने घरदेखील सोडलं होतं. वडिलांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र शेखर सापडला नाही. त्यानंतर वडिलांनी पोलिसांत धाव घेतली, पोलिसांत तक्रार दाखल केली. 


जंगलात केली आत्महत्या
वडिलांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी शेखरचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी आंबेगाव तालुक्यातील पहाडदरा गावाच्या जवळ जंगलात त्याचा सांगाडा लटकल्याचं दिसलं. पोलीस घटनास्थळी पोहोचताच त्यांनी या मृतदेहाची पाहणी केली. लटकलेल्या बॉडीत कागदपत्रं आढळलं. या कागदपत्रामुळे ती बॉडी शेखरची असल्याचं पोलिसांना समजलं. या सगळ्यानंतर बऱ्याच दिवसांपासून शेखरची वाट बघत अससेल्या वडिलांना याबाबत पोलिसांनी माहिती दिली. त्यानंतर वडिलांनी ओळख पटवली. त्याला तीन पत्नी असल्याचं आणि त्या नांदत नसल्याचं त्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. 


हाडाचा सांगाडा अन् खिशात आधारकार्ड


या घटनेत मृत्यू झालेल्या शेखरचा हाडाचा सांगाडा शेवटी मिळून आला. त्याच्या खिशात आधार कार्ड आणि पॅन कार्ड होते. पोलिसांनी नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर वडिलांची माहिती घेत वडिलांना घटनास्थळी बोलावून घेतलं. शेखर हा दोन महिन्यांपूर्वी घरातून आत्महत्या करतो म्हणून निघून गेला होता. जाताना त्याने दोरीदेखील सोबत नेली होती, असं त्याच्या वडिलांनी सांगितलं. बेपत्ता असल्याची तक्रारदेखील केली असल्याचं वडिलांनी पोलिसांना सांगितलं आहे. या प्रकरणामुळे कुटुंबियावर दुख:चा डोंगर पसरला आहे. तिन्ही पत्नीची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही.


ही बातमी देखील वाचा