Dhule Agriculture News : परराज्यातील बाजरीला धुळे (Dhule) जिल्ह्यात मोठी मागणी आहे. रोज पाचशे ते एक हजार क्विंटल बाजरीची (Millet) आवक धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत (Dhule Agricultural Produce Market Committee) येत आहे. राज्यात थंडीच्या हंगाम सुरु झाला आहे. त्यामुळं  बाजारीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. या बाजरीला सध्या दोन हजार 700 रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.


दोन ते तीन वर्षांपासून धुळे जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन कमी


यावर्षी राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. याचा मोठा फटका राज्यातील शेतकऱ्यांच्या पिकांना बसला आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेली पीक अतिवृष्टीनं वाया गेली आहेत. याचा फटका बाजरी उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. अतिवृष्टी आणि दुष्काळामुळं गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धुळे जिल्ह्यात बाजरीचे उत्पादन कमी झालं आहे. सध्या धुळे जिल्ह्यात बाजरीला मागणी वाढली आहे. त्यामुळं परराज्यातून मोठ्या प्रमाणात बाजरीची आवक धुळे जिल्ह्यात होत आहे.


'या' राज्यातून धुळे जिल्ह्यात बाजरीची आक


यंदा अतिवृष्टीमुळं धुळे जिल्ह्यातील स्थानिक शेतकर्‍यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं गहू, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळं अनेक ठिकाणी बाजरी काळी पडली आहे, परिणामी त्याची विक्री होत नसल्यानं शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. पावसाळी बाजरीचे उत्तर महाराष्ट्रात उत्पादन घटल्याने सध्या राजस्थान, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, मोराणे (उत्तर प्रदेश) आदी भागांतून बाजरी विक्रीसाठी येत महाराष्ट्रात येत आहे. हॉटेल व्यावसायिक, स्थानिक नागरिक, शहरी भागातील चाकरमान्यांकडून बाजरीला मोठी मागणी आहे. या बाजरीला सध्या दोन हजार सातशे रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे.


बाजरीला किलोला 30 ते 35 रुपयापर्यंतचा दर


सध्या हिवाळा असल्यामुळं बाजरीच्या मागणीत दुपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. बाजरीचा भाव प्रतिकिलो 15 ते 20 रुपयांवरून 24 ते 27 रुपये झाला आहे. किरकोळ बाजारात हा भाव 30 ते 35 पर्यंत आहे. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत राजस्थान, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाना, मध्य प्रदेश राज्यांतून दररोज पाचशे ते हजार क्विंटल बाजरीची आवक होत आहे. बाजार समितीत बाजरीला किमान प्रतिक्विंटल तब्बल दोन हजार चारशे ते कमाल दोन हजार सातशे रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे. ग्रामीण भागात बाजरीला मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने विविध राज्यातून आलेली बाजरी खरेदी करण्यासाठी नागरिकांची चांगली गर्दी होत आहे. यातून कृषी उत्पन्न बाजार समितीत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


PM Modi : येणारं वर्ष बाजरी वर्ष! पंतप्रधान म्हणाले, शेतकऱ्यांनो तृणधान्यांची अधिकाधिक लागवड करा