Nagpur News : अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरूवारी सकाळपासून नागपुरातील सुपारी व्यापाऱ्यांकडे छापेमारी केली. या कारवाईमुळे नागपुरसह मध्य भारतातील सुपारी व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील सुपारीकिंग छटवाल यांना आसाम पोलिसांनी (Assam Police) अटक केल्याच्या बातमीनंतर प्रकाश गोयल, आसिफ कलीवाला, दिग्विजय ट्रान्सपोर्टचे हिमांशु भद्रा आदींवरही छापे मारल्याने सुपारी व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
छापेमारी केलेले सर्व व्यापारी परदेशातून सुपारी आयात (Foreign betel nut imports) करणारे आहेत. यापूर्वीही ते वेगवेगळ्या तपास यंत्रणांच्या रडारवर आलेले आहेत. छापेमारी करत असलेल्या ईडीच्या टीममध्ये मुंबई आणि अन्य शहरातील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या छापेमारीची बातमी वाऱ्याच्या वेगाने शहरात पसरल्याने इतर सुपारी व्यापारी सावध झाले. यापूर्वी सीबीआयनेही (CBI) धाडी घालून अवैध व्यापारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला होता.
व्यापाऱ्यांकडून इंडोनेशिया, थायलंड व श्रीलंकेतून सुपारी आयात करण्यात येत होती. मसकासाथ ओल्ड कारपोरेशन बिल्डिंग केरला गल्ली येथील गोयल ट्रेडिंगसह अल्ताफ कलीवाला सुपारी, वाशिम बावला सुपारी यांच्यासह आदींकडे छापेमारीची कारवाई सुरु असल्याची माहिती आहे. या छापेमारीमध्ये यापूर्वी विविध राज्यातून छापेमारीमध्ये पकडण्यात आलेल्या सुपारीचे कनेक्शन असल्याचे बोलले जात आहे.
आणखी अपडेट थोड्याच वेळात...