एक्स्प्लोर

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी अखेर बदलले, मल्लिकार्जुन खर्गेंकडे धुरा

काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी संघटनेत अनेक बदल करायला सुरुवात केली आहे.

नवी दिल्ली : 2019 च्या निवडणुकांना सामोरं जाण्याआधी काँग्रेसने अखेर महाराष्ट्र प्रभारी बदलले आहेत. मोहन प्रकाश यांच्याऐवजी आता लोकसभेतले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या वर्षातच हा महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राचा प्रभार मोहन प्रकाश यांच्याकडेच होता. ए के अँन्टोनी हे प्रभारी असताना मोहन प्रकाश सहप्रभारी होते, त्यानंतर त्यांच्याकडेच ही जबाबदारी देण्यात आली होती. जवळपास नऊ वर्षे मोहन प्रकाश हे प्रभारी म्हणून काम करत होते. काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राहुल गांधींनी संघटनेत अनेक बदल करायला सुरुवात केली आहे. अनेक राज्यात तरुण चेहऱ्यांना प्रभारी, प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र 75 वर्षांच्या मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अनुभवाला प्राधान्य देण्यात आलं आहे. मल्लिकार्जुन खर्गे हे महाराष्ट्राजवळच्या कर्नाटकमधले आहेत, मराठीची उत्तम जाण त्यांना आहे. शिवाय महाराष्ट्रात सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण या माजी मुख्यमंत्री आणि काही मातब्बर नेत्यांची गर्दी आहे. त्यामुळे या सगळ्यांना हाताळू शकेल असा अनुभवी चेहरा पक्षाला होता, त्यामुळे ज्येष्ठ नेत्यालाच ही संधी मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सोनल पटेल (गुजरात), आशिष दुआ (हरियाणा) आणि संपथ कुमार (तेलंगणा) यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे प्रभारी बदलल्यानंतर आता प्रदेशाध्यक्षही बदलले जाणार का याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 मार्च 2026 | सोमवार
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध

व्हिडीओ

Amol Mitkari On V K Singh :व्ही.के. सिंह यांचे अंडरवर्ल्ड कनेक्शन शोधा, 'ठोक दिया' याचा अर्थ काय?
Eknath Shinde Vidhan Parishad : T 20 World Cup मध्ये टीम इंडियाचा विजय, शिंदेंकडून अभिनंदन प्रस्ताव
Vijay Wadettiwar on Budget : महाराष्ट्र कंगाल झालाय,केवळ रस्ते बांधण्यासाठी बजेट आहे का?
Gold Silver Price Drop Iran Israel War : सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण;इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम
Nashik Crime : Dr. Manisha Jejurkar प्रकरणी पतीचे विवाहबाह्य संबंध होते, माहेरच्यांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
शाळेच्या भीतीने 12 वर्षीय विद्यार्थ्याचा ‘हायव्होल्टेज ड्रामा’, स्वतःच्या अपहरणाचा रचला बनाव
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
युद्धकाळ.. गुंतवणुकीची गुरुकिल्ली ‘तिच्या’ हाती; महिलांसाठी आर्थिक नियोजनाचा प्रवास, स्वावलंबनाकडून सुरक्षिततेकडे
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
Video : युद्धाचा भडका, संभाजीनगरमध्ये 5 मोठे उद्योग बंद; लघुउद्योगावरही गॅस तुटवड्याचा परिणाम
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
अंबरनाथमध्ये केमिकल कंपनीत आग, मोठ्या स्फोटानंतर धुराचे लोट; कामगार सैरावैरा धावले
Share Market Crash : युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
युद्धामुळे शेअर बाजारात हाहाकार! Sensex  1, 352 अंकांनी गडगडला, शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे 8.5 लाख कोटी पाण्यात
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
राज ठाकरेंना वर्धापनदिनी लातूरकरांचे गिफ्ट; पंचायत समितीवर मनसे-भाजपची सत्ता, सभापती बिनविरोध
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात हायकोर्टाची सर्व 23 आरोपींना नोटीस; सीबीआय तपास अधिकाऱ्याविरुद्ध विभागीय कारवाईलाही स्थगिती, मनी लाँड्रिंग प्रकरणात सुनावणी न करण्याचे आदेश
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
इस्रायलच्या तेल साठ्यांवरील हल्ल्यानंतर इराणमध्ये तेलमिश्रीत काळाकुट्ट पाऊस, सर्वसामान्यांचे आरोग्य धोक्यात; लेबनॉनमध्ये महिला लेकरा बाळांनी रस्त्यावर रात्र काढली
Embed widget