एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मालेगाव महापालिका निवडणुकीत भाजपकडून 45 मुस्लीम उमेदवारांना संधी
नाशिक : मालेगाव महापालिकेसाठी येत्या 24 मे रोजी मतदान होत असून, या निवडणुकीत 84 पैकी 77 जागांवर भाजपने आपले उमेदवार उतरवले आहेत. विशेष म्हणजे, यातील 45 उमेदवार हे मुस्लीम आहेत.
मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली असून, महापालिका जिंकण्यासाठी भाजपने निम्म्यापेक्षा अधिक जागांवर मुस्लीम उमेदवार दिले आहेत. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने अल्पसंख्याक समाजात मोदी लाट कितपत आहे? याची चाचपणी करण्यासाठी ही रणनिती तयार केली आहे.
भाजप शिवाय शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस-जनता दल (सेक्यूलर), एमआयएम, आदी पक्षांनीही आपले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. या निवडणुकीसाठी शिवसेनेने 25 आणि एमआयएमने 37 प्रभागात आपले उमेदवार दिले आहेत.
काँग्रेसने 73 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत. तर दुसरीकडे राष्ट्रावादी काँग्रेसने माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्या जनता दल (सेक्यूलर)सोबत आघाडी करुन 66 उमेदवार उभे केलेत.
2012 च्या महापालिका निवडणुकीत भाजपने 24 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. पण या सर्वांचा पराभव झाला होता. तर 12 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली होती.
पण यंदा भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांनी मोठी रांग लावली होती. भाजपच्या तिकीटासाठी 248 जणांनी पक्षाच्या निरीक्षकांसमोर मुलाखती दिल्या होत्या. त्यातून भाजपने 77 जणांना संधी दिली असून, त्यातील 45 जण मुस्लीम उमेदवार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement