गडचिरोली :  गडचिरोलीत पोलिस दल आणि सीआरपीएफनं (Gadchirolipolice and CRPF) केलेल्या कारवाईत एका जहाल नक्षलवाद्याला (Naxal Arrest) बेड्या ठोकल्या आहेत. जहाल नक्षली करण ऊर्फ दुलसा नरोटे याला अटक करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. शासनाने त्याच्यावर दोन लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले होते. गडचिरोली पोलिस दल व सीआरपीएफ यांच्या संयुक्त कारवाईत त्याला पकडण्यात आले. 


गोपनीय माहितीच्या आधारे गट्टा (जांभिया) जंगल परिसरात विशेष अभियान पथक व सीआरपीएफ बटालियनचे जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असताना करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे यास अटक करण्यात आली. नक्षलदृष्टया अतिसंवेदनशील मौजा गोरगुट्टा येथील रहिवासी असलेला करण ऊर्फ दुलसा पेका नरोटे (वय 30) हा प्लाटून क्रमांक 14 च्या सशस्त्र दलम सदस्य पदावर कार्यरत होता. 


तसेच तो गट्टा दलम सदस्य व नक्षल्यांच्या अॅक्शन टीमचा सदस्य होता. 2008 रोजी भामरागड हद्दीत झालेल्या दोबुर जंगल परिसर चकमक व राजु धुर्वा याच्या हत्येच्या प्रकरणात त्याचा सहभाग होता. दामरंचा हद्दीतील मौजा कोरेपल्ली चकमक तसेच सन 2010 रोजी मिरकल फाटा चकमकीत व तोंडेर येथील रहिवासी चुक्कू याच्या हत्येचा प्रकरणात सक्रीय सहभाग होता. परवाच वन विभागाच्या दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाणीत तो सहभागी होता.


करण ऊर्फ दुलसा पेका नरोटेवर अनेक गुन्हे दाखल आहेत.  त्याच्यावर हत्येचे 6, चकमक  4,  दरोडा 2,  जाळपोळ 3,  अपहरण 1 असे तब्बल 16 गुन्हे दाखल आहेत.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


 






इतर काही महत्त्वाच्या बातम्या: