मुंबई  : राज्यातील दुकानांवर आता मराठी भाषेत नामफलक लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत झाल्यानंतर आता मंत्र्यांच्या बंगल्यांचीही नावंही बदलली आहेत. मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावं देण्यात आलीत. त्यामुळे आता मंत्र्यांचे बंगले हे गडकिल्ल्यांच्या नावांनी ओळखले जाणार आहेत.


 मंत्री उदय सामंत यांचा बंगला आता रत्नसिंधू नावाने ओळखला जाणार आहे. तर मंत्री आदित्य ठाकरे यांच्या बंगल्याला रायगड नाव देण्यात आलंय. राज्यभरातील शिवप्रेमींनी यासाठी सतत पाठपुरवठा केला होता. त्यांनी या संदर्भात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. उदय सामंत यांनी या प्रस्तावावर सकारात्मक पाठपुरवठा केला. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीनंतर अखेर मंत्र्यांच्या शासकीय निवास्थानांचं नामांतर करण्यात आलंय.


मंत्र्यांच्या बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावं


अ-3- शिवगड- जितेंद्र आव्हाड
अ-4- राजगड- दादा भुसे
अ-5- प्रतापगड- के.सी.पाडवी
अ-6- रायगड- आदित्य ठाकरे


बी-1- सिंहगड- विजय वडेट्टीवार
बी-2- रत्नसिंधु- उदय सामंत
बी-3-जंजिरा- अमित देशमुख
बी-4-पावनगड- वर्षा गायकवाड
बी-5- विजयदुर्ग- हसन मुश्रीफ


क-5- अजिंक्यतारा- अनिल परब
क-6- प्रचितगड- बाळासाहेब पाटील


राज्यभरात मराठी वाचवा मोहिम सुरु असताना अनेक ठिकाणच्या दुकानावरील पाट्या मात्र मराठीत नसायच्या. राज्यातील सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. पण त्याची अंमलबजावणी व्हायची नाही, तसेच दुकानदार यातून अनेक पळवाटा शोधायचे. आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत कराव्या लागणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 


सर्व दुकानांवरती मराठीत पाट्या असाव्यात असा नियम राज्य सरकारने केला होता. त्यानंतर याची अंमलबजावणी होत नव्हती. अनेक ठिकाणी इंग्रजी मध्ये मोठ्या अक्षरात नाव असायचं. मराठीत मात्र लहान अक्षरात नावं असायची. आजच्या निर्णयाने इतर भाषेच्या प्रमाणे मराठीतील नावही तेवढच मोठं ठेवावं लागणार आहे. मराठीत-देवनागरी लिपितील अक्षरे दुसऱ्या (इंग्रजी किंवा अन्य) लिपीतील अक्षरांपेक्षा लहान ठेवता येणार नाहीत, अशी दुरुस्ती मंजूर करण्यात आली.



महत्त्वाच्या बातम्या :