Maharashtra Rain Updates | चंद्रपूरमध्ये मुसळधार पावसाचा पिकांवर संमिश्र परिणाम

मुंबईसह राज्यभरात हवामान खात्याकडून 15 आणि आणि 16 जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार पावरासाचा इशारा देण्यात आला आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जोरदार सरींची शक्यता वर्तवली आहे.राज्यभरातील पावसाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Jul 2020 12:55 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यातील बहुशांत भागात आज आणि उद्या मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघरसह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मराठवाड्यासह मध्य...More

चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. विशेष म्हणजे जून महिन्यात जिल्ह्यात सरासरीच्या फक्त निम्माच पाऊस पडला होता. त्यामुळे शेतकऱ्यांना या पावसाची मोठी प्रतीक्षा होती. शेतकऱ्यांना बहुप्रतीक्षित असलेला हा पाऊस गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यात चांगलाच बरसला पण या पावसामुळे काही शेतकऱ्यांना फायदा झालाय तर काहींच्या शेतात पाणी साचलंय. पावसाने थोडी उघाड दिल्यास हे पाणी मुरण्यास मदत होईल आणि पिकाला याचा फायदा होईल. पण पावसाने पुन्हा संततधार लावली तर शेतात पाणी साचलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या पावसाने धान पिकाला चांगला फायदा झालाय. लावणीसाठी तयार केलेल्या धानाच्या बांद्यांमध्ये पाणी जमा व्हायला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सोयाबीन आणि कापसाच्या पिकावर या पावसाचा संमिश्र परिणाम दिसून आला आहे.