Nashik Accident : नाशिकच्या उड्डाणपुलावर द्वारका परिसरात (Nashik Dwarka Flyover Accident) काही दिवसांपूर्वी भीषण अपघात घडला होता. या पाठोपाठ आता नाशिकमध्ये पुन्हा एकदा भीषण अपघाताची (Nashik Accident News) घडली आहे. घोटी-सिन्नर महामार्गावर (Ghoti Sinnar Highway Accident) आज (दि. 21) मध्यरात्रीच्या सुमारास रिक्षा आणि कंटेनर यांच्यात झालेल्या धडकेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यात एका चार वर्षीय बालिकेचा समावेश आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, घोटी-सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ (SMBT Hospital) ओव्हरटेक करण्याच्या नादात कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या रिक्षाला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की रिक्षातील तिघांची जागीच मृत्यू झाला. तर इतर दोनजण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये एका चिमुकलीचाही समावेश आहे. रिक्षा चालक अमोल विनायक घुगे (रा. कल्याण), स्वरा अमोल घुगे (4), मार्तंड पिराजी आव्हाड (60), अशी मृतांची नावे आहेत. 


कंटेनर चालक पोलिसांच्या ताब्यात


अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. कंटेनरच्या जोरदार धडकेमुळे रिक्षाचा चक्काचूर झाला. तर अपघातानंतर पोलिसांनी (Police) कंटेनर चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती. 


नाशिकच्या उड्डाणपुलावरील अपघातातील मृतांचा आकडा नऊवर


दरम्यान, मुंबई-आग्रा महामार्गावरील (Mumbai-Agra Highway) द्वारका चौफुलीजवळील उड्डाणपुलावर रविवारी (दि 12) झालेल्या भीषण अपघातात आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू (Death) झाला आहे. राहुल साबळे (17) याचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे. एकुलता मुलगा गमावल्यामुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील मिस्त्रीकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. आई गृहिणी असून पश्चात लहान बहीण आहे. कुटुंबाची परिस्थिती हलाखीची असून अपघातात मुलगा गमविल्याने कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर अपघातातील इतर गंभीर जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?


Nashik Accident : मम्मी घराजवळ आलोय, 20 मिनिटात पोहोचू, मुलाचा आईला फोन अन् काही क्षणात...; नाशिकच्या अपघातातील काळीज चिरणारा प्रसंग