मुंबई : भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून घसरणीचं सत्र सुरु आहे. आज (21 जानेवारी) रोजी बाजारात घसरण पाहायला मिळाली आहे. झोमॅटो कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीचा रिपोर्ट समोर आल्यानंतर शेअरमध्ये घसरण झाली आहे. कंपनीचे शेअर 8 टक्क्यांनी घसरुन 219 रुपयांवर आले आहेत. काल देखील झोमॅटोचा शेअर घसरणीसह बंद झाला होता. ब्रोकरेज हाऊसकडून झोमॅटोच्या शेअरचं टारगेट प्राइस घटवलं आहे. झोमॅटोचं टारगेट प्राइस 130 रुपये निश्चित करण्यात आलं आहे. 


मॅक्वायरीनं काय म्हटलं?


जागतिक ब्रोकरेज हाऊस मॅक्वायरीनं झोमॅटोच्या शेअरसाठी अंडरपफॉर्म रेटिंग दिलं आहे. या ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअरसाठी 130 रुपये टारगेट प्राइस ठेवली आहे. ब्लिंकिटचे मार्जिन्स दीर्घ काळापासून नकारात्मक आहेत. विदेशी ब्रोकरेज हाऊस जेफरीजनं झोमॅटोच्या शेअर साठी होल्डिंग रेटिंग दिलं आहे. कंपनीच्या शेअर प्राइसला 275 रुपयांवरुन घटवून 255 रुपये केलं आहे. नोमुरानं झोमॅटोच्या शेअरसाठी बाय रेटिंग दिलं आहे. कंपनीनं झोमॅटोसाठी 290 रुपयांचं टारगेट दिलं आहे. Bernstein नं झोमॅटोच्या शेअरसाठी 310 रुपयांचं टारगेट प्राइस दिलं आहे. झोमॅटोला आऊटरपरफॉर्मिंग रेटिंग या ब्रोकरेज हाऊसनं दिलं आहे. 



तिसऱ्या तिमाहीत नफा 57 टक्क्यांनी घटला


झोमॅटोनं ऑक्टोबर ते डिसेंबर 2024 दरम्यान त्यांचा नफा 57 टक्क्यांनी घसरुन 59 कोटी झाल्याचं म्हटंल आहे. गेल्या आर्थिक वर्षात तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा नफा 138 कोटी रुपये होता. चालू आर्थिक वर्षात झोमॅटोचा दुसऱ्या तिमाहीत नफा 176 कोटी रुपये होता.  


डिसेंबर 2024 ला संपलेल्या तिमाहिती कंपनीची उलाढाल 64 टक्क्यांनी 5405 कोटी रुपये होती. एका वर्षापूर्वी ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान कंपनीचा महसूल 3288 कोटी रुपये होता. तिमाहीच्या आधारे कर भरल्यानंतर झोमॅटोचा नफा घटला होता.


दरम्यान, झोमॅटो या फूड डिलिव्हरी कंपनीची स्पर्धा स्विगी सोबत आहे. भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर घसरण पाहायला मिळाली होती. विदेशी गुंतवणूकदारांनी 44396 कोटी रुपये भारतीय बाजारातून काढून घेतले आहेत.


इतर बातम्या :



Mhada Lottery Konkan Board : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2264 घरांच्या लॉटरीसाठी फेब्रुवारीत मुहूर्त, 31 जानेवारीची सोडत लांबणीवर


(टीप- शेअर बाजार, म्यूच्यूअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची असून आम्ही कोणताही दावा करत नाही. या लेखामागचा गुंतवणुकीसाठी शिफारस, सल्ला देण्याचा उद्देश नाही. तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्या.)