BJP : मोदी सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानावरून ट्विटर वॉर, उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला भाजपाकडून सणसणीत प्रत्युत्तर
BJP News : मोदी सरकारच्या 'हर घर तिरंगा' अभियानावरून उद्धव ठाकरे आणि भाजपामध्ये ट्विटर वॉर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
BJP News : भारताला स्वातंत्र्य मिळून यंदा 75 वर्ष पूर्ण (Independence Day) होत आहेत. यानिमित्त देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचा उत्साह पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कालपासून 'हर घर तिरंगा' (Har Ghar Tiranga) अभियान राबवण्यात येत आहे. मात्र मोदी सरकारच्या या अभियानाबाबत सध्या राजकारण होताना दिसत आहे. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख यांनी यावर ट्वीट करत घराचा नाही पत्ता... ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे? अशी विरोधात्मक प्रतिक्रिया दिलीय. त्यावर भारतीय जनता पार्टीकडूनही याला सणसणीत प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
4 व्यक्तींना राहण्यासाठी 2 बंगल्यांची गरज लागते का? त्यातील एखादी खोली देण्याची तयारी दाखवणार का?
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) August 13, 2022
६०० कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये.
मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, अभ्यास केला असता तर ९ लाख घरे महाराष्ट्रात दिली आहेत केंद्राने हे देखील समजलं असत. https://t.co/0IweOVe2pJ
माजी मुख्यमंत्री तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 'हर घर तिरंगा' या अभिमायानाबाबत एक ट्विट करत प्रश्न विचारला आहे, "मायबाप सरकारने कार्यक्रम दिला आहे, हर घर तिरंगा, घर घर तिरंगा. घराचा नाही पत्ता... ज्यांच्याकडे घरच नाही ते तिरंगा लावणार कुठे?" असं त्यांनी आपल्या ट्विट मध्ये लिहलंय. यावर भाजपाने देखील ट्विट करत प्रत्युत्तर दिलंय.
600 कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये. - भाजपा
भाजपाने ट्विट करत म्हटलंय. 4 व्यक्तींना राहण्यासाठी 2 बंगल्यांची गरज लागते का? त्यातील एखादी खोली देण्याची तयारी दाखवणार का? 600 कुटुंबियांना बेघर करणाऱ्याला पाठीशी घालणारे असे प्रश्न करू नये. मुख्यमंत्री होते 2.5 वर्ष, अभ्यास केला असता तर 9 लाख घरे महाराष्ट्रात दिली आहेत केंद्राने हे देखील समजलं असतं.
'हर घर तिरंगा' अभियानाला सुरुवात
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हर घर तिरंगा' या अभियानाची घोषणा केली होती. यावेळी देशभरातील जनतेला त्यांच्या घरावर किंवा कार्यालयावर राष्ट्रध्वज फडकवण्याचं आवाहन केलं आहे. भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीस 75 वर्ष पूर्ण होत असल्याचं औचित्य साधून 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीमध्ये केंद्र शासनाच्या सूचनेनूसार हर घर तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची फडकवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
तिरंगा कधी फडकवता येईल?
'हर घर तिरंगा' अभियानाचा देशभरात उत्साह आहे. यापूर्वी देशात तिरंगा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकावण्याचा नियम होता. जुलै 2022 मध्ये सरकारनं या नियमात सुधारणा केली आणि त्यानंतर आता रात्रंदिवस राष्ट्रध्वज फडकवता येणार आहे.